Friday, April 26, 2024
Homeनगरबापानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बापानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) –

पाय दाबून देण्याच्या बहाण्याने जवळ झोपून आठवीत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीच्या नराधम बापानेच तिचा विनयभंग केल्याची

- Advertisement -

नात्याला काळिमा फासणारी घटना तालुक्यातील करंजी परिसरात घडली. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात बापा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नराधम बाप व त्याच्या पत्नीचे भांडण झालेले असून मुलीची आई औरंगाबाद येथे राहते. अल्पवयीन मुले बापाकडे राहतात. त्या संधीचा फायदा घेऊन बापाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत राहत्या घरी झोपलेली असताना अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पोस्टाने तक्रार अर्ज कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने पोलिसांनी याबाबत या अल्पवयीन मुलीची फिर्याद दाखल करून घेतली आहे. कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर तू आरडा ओरडा केला व कोणास काही एक सांगितले तर तुला जीवे मारून टाकील, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी या नराधम बापाविरुद्ध भादंवी कलम 354, 506 सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या