Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपिता-पुत्राची मेडिकल दुकानदाराला बेदम मारहाण

पिता-पुत्राची मेडिकल दुकानदाराला बेदम मारहाण

नाशिकरोड । प्रतिनिधी । Nashik Road

पिता-पुत्राने व त्याच्या साथीदाराने काही कारण नसताना मेडिकल दुकानदाराला बेदम मारहाण (Beating) केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

- Advertisement -

मारहाण करणारे पिता-पुत्र शिवसेनेचे (Shivsena ) पदाधिकारी आहे. याबाबत दिनेश प्रकाशचंद्र चोपडा याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यात म्हटले आहे की, मी व माझा सहकारी माझ्या मयूर मेडिकल दुकानात (Medical Shop) बसलेलो असताना अचानकपणे हॉटेल साई शिवचे मालक प्रकाश मस्के व त्यांचा मुलगा आकाश मस्के व आणखी एक साथीदार दुकानात आले व काही नसताना मला बेदम मारहाण केली. त्यानंतर मोबाईलचे काउंटरवर ढकलून दिले असता काच फुटल्याने आपल्या डोळ्याजवळ लागले. त्यामुळे रक्तस्राव होऊन मी जखमी झालो असे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, यानंतर आजूबाजूच्या सहकाऱ्यांनी दिनेश चोपडा यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल केले. तसेच या घटनेनंतर चोपडा यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिसांनी मस्के पिता पुत्र विरुद्ध व आणखी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार दराडे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या