Sunday, April 28, 2024
Homeनाशिकरज्जब सणानिमित्त मुस्लिम बांधवांच्या घरी खीर-पुरीवर फातेहा

रज्जब सणानिमित्त मुस्लिम बांधवांच्या घरी खीर-पुरीवर फातेहा

जुने नाशिक l Old Nashik (प्रतिनिधी) :

इस्लाम धर्माचे जेष्ठ धर्मगुरु हजरत ईमाम जाफर सादीक यांच्या पवित्र स्मतिप्रित्यार्थ आज (दि. ७) मुस्लिम बांधवांनी पवित्र रज्जबचा मोठा सण उत्साहात, इस्लामी पद्धतीने साजरी केला, यानिमित्ताने मुस्लिम बांधवांनी घरोघरी सुकामेवा पासून तयार केलेल्या पुऱ्या व खीरसह इतर गोड पदार्थवर विषेश फातेहा पठाण केले.

- Advertisement -

सकाळपासून प्रसाद घेण्यासाठी मुस्लिम बहुल भागात वर्दळ होती, दुपार नंतर महिलांनी एकमेकांच्या घरी जाऊन प्रसाद घेतला. इस्लामी रज्जब महिन्याच्या २२ तारखेला सण साजरा केला जातो. आज तीच तारीख होती.

या पवित्र सणाची लगबग मागील दोन आठवड्यांपासून सुरू होती. सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी घराची संपूर्ण विशेष स्वच्छता करून रंगरंगोटी केली आहे, या सणाच्या नंतर सुमारे एक महिन्यांनी पवित्र रमजानुल मुबारकचा महिना देखील सुरू होतो. सुकामेवा पासून पुऱ्या बनविण्याचे कार्य मागील 3-4 दिवसांपासून होत आहे.

तर शनिवारी रात्री उशिरापर्यंत महिला वर्ग या कामात दंग होते. तर घरातील पुरुष मंडळी व लहान मुलांनी देखील त्यांना मदत केली. आज सकाळी फजरची नमाज नंतर घराच्या इबादत करण्याच्या ठिकाणी फुलांनी दस्तर सजऊन त्यावर पुऱ्या व खीर व मिठाईचे ताटं ठेवून फातेहा पठाण करण्यात आले.

काही ठिकाणी मातीचे बर्तन होते. जवळच्या लोकांना बोलावून प्रसाद देण्यात आले, जुने नाशिक परिसरातील किराणा दुकान तसेच सुकामेवाचे दुकान व दूध घेण्यासाठी बाजारात दोन दिवसापासून भाविकांची मोठी गर्दी होती.

जुने नाशिकच्या कोकणीपुरसह काही भागात शनिवारी सायंकाळी फातेहा पठाण झाले. करोनच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी विशेष दक्षता घेतली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या