Friday, April 26, 2024
Homeनगरखासगी नोकरदारावर जीवघेणा हल्ला

खासगी नोकरदारावर जीवघेणा हल्ला

अहमदनगर (प्रतिनिधी)

किरकोळ कारणातून १० जणांच्या टोळक्याने एका खासगी नोकरदारावर कार्यालयात जाऊन जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अतुफ अल्लाउद्दीन शेख (वय २७ रा. फकीरवाडा, नगर) हे जखमी झाले आहेत. सावेडीतील अमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेसच्या कार्यालयात ही घटना घडली. हल्लेखोरांनी कुऱ्हाड, चाकू, लोखंडी पाईप, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, बेल्टचा वापर केला.

- Advertisement -

जखमी शेख यांनी रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये किरण पाटील, अतिश, सनी दंडवते, नितीन जाधव, अदित्य धनवडे (पूर्ण नावे, पत्ता माहिती नाही) व अनोळखी पाच इसमांचा समावेश आहे.

शेख हे दुचाकीवरून त्यांच्या कार्यालयातून घरी जात असताना अनुराग अपार्टमेंटसमोर शेळी आल्याने त्यांनी दुचाकी अचानक थांबवली. त्यावेळी किरण पाटील हा त्याच्या दुचाकीवरून समोरून आल्याने तो दचकला. त्यावेळी शेख व पाटील यांच्यात शाब्दीक वाद झाले. यानंतर शेख हे त्यांचा मोबाईल घेण्यासाठी कार्यालयात गेले असता पाटील याने इतर साथीदारांना सोबत घेऊन शेख यांच्यावर कार्यालयात हल्ला केला. कार्यालयातील साहित्यांची तोडफोड केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या