Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकशेतकरी संघटनेच्या उपोषण, पदयात्रेस प्रारंभ

शेतकरी संघटनेच्या उपोषण, पदयात्रेस प्रारंभ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक थकबाकीदार शेतकऱ्यांकडून सक्तीच्या वसुली करत आहे.शेतकर्यांच्या जमीनीवर बँक व सोसायटीचे नाव लावले जात आहे.जिल्हा बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांवर होत असलेल्या या अन्यायाविरुद्ध शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांनी निफाड तालुक्यातील श्री क्षेत्र खेडलेझुंगे येथून अन्नत्याग, पायी दिंडीला शुक्रवारी (दि.२३) सुरुवात केली.

- Advertisement -

वैकुंठवासी तुकाराम बाबा यांच्या चरणी लीन होऊन निफाड तालुक्यातुन संघर्ष यात्रेला सुरुवात केली.कांद्याच्या माळा गळ्यात घालून राज्य व केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणाविषयी जोरदार घोषणा देत शासनाला जाग आणण्यासाठी या मोहीमेस सुरुवात करण्यात आली.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी ललित बहाळे यांना जाहीर पाठिंबा दिला व त्यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार केला.

सुरगाणा बाजार समितीत प्रथमच कांदा लिलाव सुरू

यावेळी महिला आघाडीच्या प्रांताध्यक्ष निर्मला जगझाप,शेतकरी संघटनेचे पाईक संधान,जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे,बाबासाहेब गुजर,त्रंबक चव्हाणके,बाजीराव कोकाटे,एकनाथ गिते, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष गजानन आबा घोटेकर,संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब तासकर,रामदास गवळी,सागर गवळी,ज्ञानेश्वर गायकवाड,रामकृष्ण बोंबले,ज्ञानेश्वर तासकर आदी पदाधिकाऱ्यांनी या संघर्ष यात्रेत सहभाग घेतला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या