Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशचार चाकी वाहनांना फास्टटॅग नसेल तर दुप्पट टोल

चार चाकी वाहनांना फास्टटॅग नसेल तर दुप्पट टोल

नवी दिल्ली :

टोलनाक्यांवरुन जाणाऱ्या सर्व गाड्यांसाठी फास्टटॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. नव्या वर्षापासून म्हणजेच १ जानेवारीपासून फास्टटॅग नसलेल्या वाहनांवर मोठा भूर्दंड बसणार आहे. त्यांना दुप्पट टोल लागणार आहे.

- Advertisement -

आता सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्टटॅग’ अनिवार्य केले आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढले असून यामध्ये १ जानेवारीपासून सर्व चार चाकी वाहनांसाठी ‘फास्टटॅग’ अनिवार्य करण्यात आले. विशेष म्हणजे हा नियम १ डिसेंबर २०१७ च्या अगोदर खरेदी झालेल्या वाहनांसाह M आणि N कॅटेगिरीतील वाहनांना देखील लागू असणार आहे.

70 टक्के वाहनांना फास्टटॅग

फास्टटॅगचे विशिष्ट अकाऊंट तयार असेल त्यातून टोलचे पैसे आपोआप कट होणार आहेत. तसेच टोलनाक्यावर वाहनाची ओळखही होणार आहे. यातील रक्कम संपल्यानंतर फास्टटॅगला पुन्हा रिचार्ज करावा लागणार आहे. आतापर्यंत 70 टक्के चारचाकी वाहनांनी फास्टटॅग करुन घेतले आहे.

…तर दुप्पट टोल

विना फास्टटॅग वाहनांनी फास्टटॅग मार्गिकेचा वापर केला तर वाहनांना दुप्पट टोल आकारण्यात येतो. देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवर टोलनाक्यांवर फास्टटॅग लेन सुरू झालंय. या योजनेमुळे टोलनाक्यातून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस आणि झटपट होतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या