Thursday, April 25, 2024
Homeनगरन्यू नॉर्मलच्या दिशेने वेगाने वाटचाल

न्यू नॉर्मलच्या दिशेने वेगाने वाटचाल

अहमदनगर | ahmednagar –

करोना निर्बंध Corona restrictions मोठ्या प्रमाणावर हटल्यानंतर नगरची बाजारपेठ market ‘नॉर्मल’ होत आहे. रविवारी सुटी असल्याने बाजारपेठेत उसळलेली गर्दी ( Crowds in the market ) चिंता वाढविणारी होती. मात्र त्यानंतर आता नागरिकही सावधपणे वावरत असल्याचे चित्र आहे. भारतात मंगळवारी सकाळी 5 महिन्यातील सर्वात कमी करोना रूग्णसंख्येची नोंद समोर आली. त्यासोबतच नगर जिल्ह्यात 568 बाधितांची नोंद झाल्याने न्यू नॉर्मलचे संकेत बळकट झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यातील ही सर्वात कमी रूग्णसंख्या नोंद आहे.

- Advertisement -

15 ऑगस्टपासून राज्यात करोना निर्बंध शिथील ( Relaxation of corona restrictions in the state ) झाले. नगर जिल्ह्याचीही या निर्बंधांतून सुटका झाली. यानंतर बाजारपेठ आणि कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाले. रविवारी सुटीचा दिवस असल्याने नगर शहराच्या बाजारपेठेतील अनेक भागात गर्दी उसळल्याने चिंता वाढली होती. मात्र सोमवारी दैनंदिन कामाचा दिवस सुरू झाल्यानंतर गर्दीचे हे चित्र विरळ झाले. मंगळवारची सकाळही नॉर्मल होती.

सध्या नगर शहरातील करोना बाधितांची संख्या सरासरी 30 च्या घरात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संख्या मात्र अद्यापही चढी आहे. राज्यात सर्वाधिक बाधितांच्या संख्येत जिल्ह्याचा समावेश होतो. मात्र तुलनेत जिल्ह्याची लोकसंख्या अधिक असून प्रशासनाने चाचण्यांचा वेगही वाढवला आहे. त्यामुळे ही संख्या अधिक असल्याचे प्रशासकीत सुत्रांचे मत आहे. यानंतरही नागरिकांनी संयम बाळगून परिस्थितीला सामोरे जाणे अपेक्षीत आहे.

नगर@ 568

अहमदनगर जिल्ह्यातील मंगळवारी दुपारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 568 बाधितांची नोंद झाली. त्यात नगर महापालिका व भिंगार छावणी परिषद क्षेत्रात एकूण 12 रूग्णांचा समावेश आहे. नगर तालुक्यातील रूग्णसंख्या मात्र 44 आहे. जिल्ह्यात संगमनेरमध्ये सर्वाधिक 122 बाधित आढळले. जिल्ह्यात शेवगाव 64, अकोले 52, कर्जत 50, पारनेर 38, पाथर्डी 37, राहाता 36, राहुरी 24, कोपरगाव 22, श्रीगोंदा 21, श्रीरामपूर 16, नेवासा 15, जामखेड 6 अशी तालुकानिहाय बाधितांची संख्या आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या