Friday, May 10, 2024
Homeदेश विदेशपंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढली - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढली – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली –

पंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. या योजनेमुळे निसर्गाच्या अनिश्चिततेविरोधात लढणार्‍या

- Advertisement -

कोट्यवधी शेतकर्‍यांना फायदा झाला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीला बुधवारी (13 जानेवारी) पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.

नमो अ‍ॅपवरून पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकर्‍यांना कशाप्रकारे मदत झाली याची माहिती घ्या असे आवाहन त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून नागरिकांना केले. कठोर परिश्रम करणार्‍या शेतकर्‍यांचा निसर्गाच्या अनिश्चिततेपासून बचाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा पंतप्रधान पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली. या विमा योजनेने आज पाच वर्षे पूर्ण केली आहेत. या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून, शेतकर्‍यांसमोरील धोका कमी झाला तसेच कोट्यवधी शेतकर्‍यांना या योजनेचा फायदा झाला. या योजनेतील लाभार्थ्यांचे मी अभिनंदन करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या