Wednesday, April 24, 2024
Homeनगरपावसाने दडी मारल्याने पिके वाचवण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड

पावसाने दडी मारल्याने पिके वाचवण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड

राहाता (प्रतिनिधी) / Rahata – पावसाने (rain) दडी मारल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. राहाता तालुक्यात जवळपास 30 टक्के खरिपाची पेरणी झाली असून येत्या काही दिवसांत जर पाऊस पडला नाही तर शेतकरी (farmers) आर्थिक संकटात सापडणार आहेत.

तालुक्यातील अनेक भागांत पेरणीयोग्य पाऊस पडल्याने शेतकर्‍यांनी आपल्या शेतात खरीप पिकांची पेरणी केली आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ही पिके आता संकटात सापडली आहेत.पिकं वाचवण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे.

- Advertisement -

तालुक्यात सर्वात जास्त सोयाबीन आणि मक्याचा पेरा झाला आहे. तर पाऊस कमी प्रमाणात असलेल्या भागात अजूनही अनेक शेतकर्‍यांनी पेरणी केली नाही. ज्यांनी पेरणी केली आहे त्यांनी पावसाने दडी मारल्याने तुषारसिंचनाचा सहारा घेतला आहे. खडकेवाके शिवारात विकत पाणी घेऊन शेतकरी पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

राहाता तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकरी वरुणराजाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलाय पण वरुणराजा दर्शन देईनासा झाला आहे. जर येत्या काही दिवसांत वरुणराजाने दर्शन दिलं नाही तर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून अवेळी आणि अपुर्‍या पडणार्‍या पावसामुळे शेतकर्‍यांना नापिकीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकर्‍यांनी यावर्षी तरी बर्‍यापैकी पाऊस होईल या आशेने बी-बियाणे व खताची जुळवाजुळव केली. पावसानेही थोड्या प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकरी पेरते झाले होते. मात्र पेरणी केलेली पिके बर्‍यापैकी अंकुरले असतानाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने पिके शेवटची घटका मोजताना दिसत आहेत.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला थोडीशी ओल आली त्यामुळे महागडे बियाणे घेऊन पेरणी केली. मात्र पाऊस नसल्याने पीक उगवेल की नाही अशी शंका आहे. अगोदरच शेतकरी देशोधडीला लागले आहेत. पुन्हा खर्च करून हातात काहीच पडले नाही तर शेतकर्‍यांचे मोठं नुकसान होणार आहे.

– सचिन मुरादे, सरपंच, खडकेवाके

26 जून नंतर दोन दिवस पाऊस झाला त्यानंतर धाडस करून सोराबीन पेरली. मात्र आठ दिवस झाले पावसाने दडी मारली. शेवटी लाखो रुपरे खर्च करून सारपनने पाणी आणले. तुषार सिंचनाचा वापर करून पाणी देत आहे मात्र तरीही पिके जगतील याची शाश्‍वती नाही.

– संतोष मुरादे, शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या