Thursday, April 25, 2024
Homeजळगावसौर कृषिपंपाची शेतकर्‍यांना प्रतिक्षा

सौर कृषिपंपाची शेतकर्‍यांना प्रतिक्षा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत जळगाव परीमंडळात 3987 सौरकृषीपंप वाटपाचे उद्दीष्ठ देण्यात आले असून जळगाव जिल्ह्यात 1997 सौर पंप मंजूर झाले आहेत.

शेतकर्‍यांनी दाखल केलेल्या तसेच मंजूर प्रस्तावानुसार शेतकरी हिस्सा रकमेचा भरणा केलेल्या शेतकर्‍यांना सौर कृषीपंप देण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात आली आहे. आतापर्यंत 824 लाभार्थी शेतकर्‍यांच्या शेतात सौर कृषीपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. कोरोनाकाळात जोडणी प्रक्रियेची गती कमी झाली होती. आता ही प्रक्रिया गतिमान होऊन लवकरच उर्वरित शेतकर्‍यांच्या शेतात सौर पंप स्थापित करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

फारूक शेख, अधीक्षक अभियंता, महावितरण

जळगाव परीमंडळात यासाठी 11हजार 683 शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले असून जळगाव जिल्हयातील 3835 शेतकर्‍यांनी अर्ज केले आहेत.

आतापर्यंत यापैकी आतापर्यत जिल्हयात 824 शेतकर्‍यांच्या शेतात सौरपंप कार्यान्वित झाले असून, गत पाच सहा महिन्यांपासून जळगाव धुळे नंदूरबार जिल्हयातील शेतकर्‍यांनी त्यांच्या हिश्याची रकमेचा भरणा करूनही अद्याप 1511शेतकरी सौर कृषी पंप जोडणीच्या प्रतीक्षेतच असल्याचे समोर आले आहे.

शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी महावितरणच्या विजेवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी पर्याय म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेला तत्कालीन युती शासनाच्या काळात अस्तीत्वात येवून मध्यंतरीच्या काळात बंद होण्याच्या गर्तेत असतांना महाविकास आघाडीकडून पुनरूज्जीवन करण्यात आले होते. त्यानुसार या योजनेंतंर्गत राज्यभरात 1 लाख कृषी पंप मंजूर करण्यात आले.

यापैकी जळगाव परीमंडळात 3987 चा कोटा मंजूर करण्यात आला असून त्यापैकी जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला 1997 सौर पंप आले आहेत. यासाठी जिल्ह्यातील 3835 शेतकर्‍यांनी अर्ज केले.

यापैकी 2540 अर्जदार शेतकर्‍यांनी ए-वन फॉर्म दाखल केले आहेत. यातील 1488 शेतकर्‍यांना कोटेशन देण्यात येवून 1295 शेतकर्‍यांचे अर्ज विविध कारणांमुळे रद्द झाले आहेत.

आता पर्यंत 1173 शेतकर्‍यांनी लाभार्थी हिश्याच्या रकमेचा भरणा केलेल्या शेतकर्‍यांपैकी 824 या शेतकर्‍यांच्या लाभ क्षेत्रावर सौर पंप मंजूर होऊन त्यांच्या शेतात कार्यान्वितही झाले आहेत. दरम्यान, कोरोना संसर्ग काळात सौर पंप स्थापित करण्याची प्रक्रिया थांबल्यामुळे गत सहा महिन्यांपासून पैसे भरलेल्या 349 शेतकर्‍यांना अद्यापही सौर पंपांची प्रतीक्षाच आहे.

अर्ज नामंजूर होण्याची कारणे

सौरकृषी पंप योजनेंतर्गत 7/12 उतारा अयोग्य, आधार कार्ड, सद्यस्थितीत वीजवितरणची जोडणी अस्तीत्वात आहे, पाण्याची उपलब्धता नसणे, संबधींत विभागांकडून परवानगी नसणे, विहिरीवर अन्य शेतकरी हिस्सा असणे अशा अनेकविध कारणांमुळे अर्ज नामंजूर झाले असल्याचे

सात कंपन्यांना कंत्राट

सात कंपन्यांना 1,997 पंपांचे उद्दिष्ट जिल्ह्यासाठी मंजूर झालेले 1,173 पंप शेतकर्‍यांच्या शेतात स्थापित करण्याचा ठेका सात कंपन्यांना देण्यात आले आहे.

यामध्ये टाटा सोलर पॉवर लि., सीआरआय पंप,एल अ‍ॅन्ड टी, रविंद्र एनर्जी, महिन्द्रा सस्टेन्ड, शक्ती, जी.के. एनर्जी, स्पॅन नोव्हस अशा 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांनी आतापर्यंत 824 शेतकर्‍यांच्या शेतात पंप कार्यान्वित केले आहेत.

जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी महावितरणची वीज जोडणीच्या प्रतिक्षेत हजारो शेतकरी असून त्यांनी ए1 फॉर्मसह डिमांडनोट देखील भरली आहे. तर काही ठिकाणी भौगोलिक परिस्थितीमुळे महावितरणची वीज पुरवठा होवू शकत नाही याला पर्या सौर ऊर्जा कृषी पंप योजनेकडे पाहिले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या