शासनाच्या निषेधार्थ आ.चव्हाणांसह शेतकर्‍यांचे मुंडण आदोलन

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ शेतकरी बंधुंना वीज वितरण कंपनी अधिकारी श्री. शेख यांना शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी खुर्चीला बांधल्यामुळे १२ दिवस जेलमध्ये डांबून ठेवल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

या शासनाचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील ऋषीपांथा,बहाळ येथे आज सकाळी १० वा. आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकर्‍यांनी मुंडण करून राज्य शासनाचे तेरावे घातले. यावेळी तीन पायाच्या खुर्ची वर तिघाडी सरकारचा फोटो ठेवून सरकारचे श्राध्द घालण्यात आले.