Thursday, April 25, 2024
Homeनगरशासन फक्त शेतकर्‍यांच्या योजनांना आडकाठी आणत आहे - आ. तनपुरे

शासन फक्त शेतकर्‍यांच्या योजनांना आडकाठी आणत आहे – आ. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

गतिमान शासन अशी वल्गना करणारे शासन शेतकर्‍यांना दिवसा वीज देण्याच्या केवळ घोषणा करताना शेतकरी हिताच्या योजनांना आडकाठी आणत असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला.

- Advertisement -

शेतकर्‍यांच्या प्रश्नाबाबत माजीमंत्री व राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे राहुरी तालुक्यातील आरडगाव येथून फेसबुकवरून जनतेशी संवाद साधताना बोलत होते.शेतकर्‍यांच्या हिताच्या वल्गना करणार्‍या शासनावरही त्यांनी उघडपणे ताशेरे ओढले. राज्यात महाविकास आघाडीचे अडीच वर्षे सरकार होते. नंतर शिंदे-फडणवीस यांचे सरकार आठ महिन्यांपूर्वी राज्यात आले. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत तत्कालीन ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री असताना अथक परिश्रम व प्रयत्नातून राहुरी तालुक्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ऊर्जा प्रकल्प मंजूर करून घेतला.

बाभुळगाव, आरडगाव येथील पंचक्रोशीतील गावांना व ग्रामस्थांना एकत्र करीत या योजनेचे महत्त्व पटवून सांगितले. ग्रामस्थांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आपापल्या जमिनी देण्याची तयारीही दर्शवली.गेल्या काही वर्षांपासून शेतकर्‍यांना रात्रीची वीज मिळत असल्याने आणि वन्य पशु प्राण्यांचा त्रास होत असल्याने असा प्रकल्प व्हावा, अशी मागणी होती.ही पूर्णत्वाकडे नेत असतानाच महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. उपमुख्यमंत्री व अनेक खात्यांचा कारभार असणारे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक घोषणा केल्या.

विधानसभेत पुर्णत्वास आलेल्या बाभूळगाव सौर प्रकल्पावर लक्षवेधी केली. त्यानंतर शासनाला जाग आल्याने त्यांनी हा प्रकल्प सुरू केला. काल आरडगाव येथील या योजने संदर्भात सोशल मीडियावर फेसबुक लाईव्ह करून सर्वांचेच लक्ष वेधले. गतिमान शासनाच्या वल्गना करणारे शासन शेतकर्‍यांना दिवसा वीज देण्याच्या केवळ घोषणा करताना शेतकरी हिताच्या योजनांना आडकाठी आणत असल्याचा आरोप यावेळी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला. यावेळी आरडगाव, केंदळ व लाभार्थी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या