Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशशेतकरी आंदोलन : लाल किल्ल्याला छावणीचं स्वरुप

शेतकरी आंदोलन : लाल किल्ल्याला छावणीचं स्वरुप

दिल्ली l Delhi

कृषी कायदे रद्द करावेत, यासाठी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी काल दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. पण या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसाचाराचं वळण लागलं. आंदोलकांनी लाल किल्ल्यामध्ये घुसून हिंसाचार केला.

- Advertisement -

दरम्यान, काल झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी लाल किल्ला परिसरातील सुरक्षा मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. यासोबतच लाल किल्ला मेट्रो स्टेशन प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचा मार्ग बंद केला आहे. जामा मस्जिद मेट्रो स्टेशन प्रवेशद्वारही बंद आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन द्वारा ही माहिती देण्यात आली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार लाल किल्ला मेट्रो स्टेशन प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय पर्यटनमंत्री प्रहलाद पटेल यांनी लाल किल्ला परिसराची पाहणी केली आहे. ज्या व्यक्तीने लाल किल्ल्यावर हा झेंडा फडवला त्यावर मोठी कारवाई करण्याचा विचार गृह मंत्रालय करत आहे. त्यासंबंधी दिल्लीत आज बैठक होत आहे.

दिल्लीतील इंटरनेट सेवा स्थगित; शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

ट्रॅक्टर परेड सोबत लाल किल्ला येथे घुसलेल्या शेतकऱ्यांना दिल्ली पोलिसांनी रात्री उशीरा बाहेर काढले. लाल किल्ला परिसर पूर्णपणे खाली करण्यात आला. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनीही संयम दाखवला. ट्रॅक्टर रॅलीला वेगळे वळण लागल्यानंतरही पोलिसांनी मोठ्या संयमाने परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला दिल्ली पोलिस शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली हाताळण्यात अयशस्वी ठरले असाही आरोप होतो आहे. शेतकरी आणि आंदोलक यांच्यात झालेल्या झटापटीत पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणावर जखमी झाली. शेतकरीही जखमी झाले. काल झालेल्या हिंसाचारानंतर केंद्रीय मंत्री प्रहलाद पटेल यांनी केली लाल किल्ल्याची पाहणी केली आहे.

शेतकरी आंदोलनाने तणाव; आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावला झेंडा

कालच्या हिंसाचारात आत्तापर्यंत दिडशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ४१ पोलीस लाल किल्ल्यावर, ३४ पूर्व दिल्ली भागात, ३० द्वारका जिल्ह्यात, २७ पश्चिम दिल्ली, १२ आउटर नॉर्थ आणि पाच पोलीस शाहदरा जिल्ह्यात जखमी झाले आहेत. दोन पोलिसांची प्रकृती गंभीर असून किरकोळ जखमी झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या