Friday, April 26, 2024
Homeनगरडाळिंब खरेदी करून पैसे देण्यास नकार; शेतकर्‍यांची पोलिसांत फिर्याद

डाळिंब खरेदी करून पैसे देण्यास नकार; शेतकर्‍यांची पोलिसांत फिर्याद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

खंडाळा परिसरातील शेतकर्‍यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या शेतातील डाळिंब खरेदी करून नाशिक जिल्ह्यातील

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव केतकी येथील व्यापार्‍याने पैसे देण्यास नकार देऊन 16 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकबर तांबोळी याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा परिसरातील शेतकरी विजय ढोकचौळे व अन्य शेतकर्‍यांचा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव केतकी येथील अकबर अल्लाउद्दिन तांबोळी या व्यापार्‍याने विश्वास संपादन करून त्याने त्यांच्या शेतातील 15 लाख 72 हजार 765 रुपये किमतीचे डाळिंब खरेदी केले. अकबर याने या डाळिंब खरेदी बदल्यात शेतकर्‍यांना स्टेट बँक ऑफ इंडिया दिंडोरी शाखेतील न वटणारे चेक देऊन फसवणूक केली.

बँक खात्यात पुरेशी रक्कम न ठेवल्याने चेक पुन्हा परत गेले. त्यावेळी विजय ढोकचौळे व अन्य शेतकर्‍यांनी त्यास वेळोवेळी मोबाईलवरून फोन केले. परंतु त्याने उत्तर दिले नाही. शेवटी शेतकर्‍यांनी अकबर तांबोळी याचे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव केतकी या गावी जाऊन त्याचे घरी गेले व पैशाची मागणी केली. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याने मोबाईल बंद करून ठेवला.

तसेच त्याने दिलेल्या पत्त्यावर तो सध्या आढळून येत नाही. अकबर तांबोळी याने स्वतःचा फायदा करून घेत स्वार्थी हेतूने शेतकर्‍यांचे डाळिंबाचे पैसे बुडवून फसवणूक केली. याप्रकरणी खंडाळा येथील शेतकरी विजय ढोकचौळे यांनी श्रीरामपूर शहात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अकबर अल्लाउद्दिन तांबोळी याचे विरुद्ध भा.दं.वि. कलम 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक आयुष नोपानी यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकर्‍यांकडे चौकशी केली. याप्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक श्री. पाटील पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या