Friday, April 26, 2024
Homeनाशिकबुलेट ट्रेन प्रकल्पाला शेतकर्‍यांचा विरोध

बुलेट ट्रेन प्रकल्पाला शेतकर्‍यांचा विरोध

घोटी । वार्ताहर

इगतपुरी तालुक्यात मुंबई-नागपूर दरम्यान समृद्धी महामार्गाजवळून हायस्पीड रेल्वे अर्थात बुलेट ट्रेनचा प्रस्ताव आहे. त्यादृष्टीने हालचालीही सुरु झाल्या आहे. संबंधित विभागाचे अधिकारी ज्या भागातून बुलेट ट्रेन जात आहे त्या भागातील शेतकर्‍यांशी संवाद साधत आहेत.याच अनुषंगाने बेलगाव तर्‍हाळे येथे शासनाच्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत शेतकरी आणि प्रकल्पाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी प्रकल्पाबाबत शेतकर्‍यांना माहिती द्यावी. शेतकर्‍यांना गाफील ठेऊन एकतर्फी कारभार केल्यास या प्रकल्पाला शेतकर्‍यांचा विरोधच राहील असा इशारा देण्यात आला.

- Advertisement -

बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गासाठी इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तर्‍हाळे येथे अधिकार्‍यांनी ग्रामस्थांशी बैठक घेऊन चर्चा केली. बुलेट ट्रेन ( हायस्पीड ट्रेन ) इगतपुरी तालुक्यातील गावातील जमिनीतून जात आहे. त्यांनी या प्रकरणी शेतकरी बांधवांना सविस्तर माहिती दिली. या मार्गातील शेतकरी बंधूंचे यामध्ये काय नुकसान होते, किती शेती जात आहे? याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. शेतकरी बांधवांनी बुलेट ट्रेन बाबतचा फॉर्म भरून संमती द्यावी, अशी अपेक्षा अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी त्या प्रस्तावाला नकार दिला. आधी तुम्ही जाणार्‍या मार्गाचे क्षेत्र, गट नंबर, शेत मालकाचे नाव हे सर्व घोषित करावे. शेतकरी वर्गाची समृद्धी महामार्गाच्या संपादनावेळी फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे एक प्रकल्प असताना प्रत्येक गावाला वेगळे दर दिले गेले. अनेकांची फसवणूक करून तत्कालीन सरकार, प्रशासन, दलाल यांनी लोकांना खोटे बोलून फसवले. पूर्ण शेती बागायती लावणे, इतर तालुक्यातील अनेक लोकांना जास्त भाव दिले. परस्पर कुठली तरी समिती शेतकरी वर्गास चर्चा न करता दर ठरवून मोकळे झाले.

शेतजमीन मालकाला विचारात न घेता बळजबरीने दर लादून खरेदी केली. तुम्ही एकदम सर्व पारदर्शक सांगावे अशी स्पष्ट भूमिका उपस्थित शेतकर्‍यांनी घेतली विश्वासात न घेता होणार्‍या एकतर्फी कारभाराला लोकांचा विरोध राहील असा इशारा शेतकर्‍यांनी दिला. यावेळी बेलगाव तर्‍हाळे येथे मुंबई नागपूर हाय स्पीड रेल्वे प्रकल्प मुंबईचे अधिकारी शाम चौगुले, गणेश भोईर, रमेश शेलार आदींसह शेतकरी प्रतिनिधी इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, शशिकांत आव्हाड, निवृत्ती तुपे, ज्ञानेश्वर कडू , वसंत भोसले, सुखदेव आव्हाड, भरत वारुंगसे, गजीराम आव्हाड, अनिल सोनवणे, ग्रा,पं, सदस्य संतोष वारुंगसे, नारायण आव्हाड, जालिंदर आव्हाड, पांडुरंग सांगळे शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या