Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारतळोदा : रासायनिक खते घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा

तळोदा : रासायनिक खते घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा

तळोदा – Taloda

येथे खते मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी सकाळपासून लांबाच लांब रांगा लावल्याचे दिसून आले. शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘बांधावर खत’ योजना सुरू केली असली तरी याठिकाणी मात्र या योजनेसह सोशल डिस्टंसिन्संगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.

- Advertisement -

सकाळी 6 वाजेपासूनच ग्रामीण भागातील शेतकरी खतांच्या दुकानांबाहेर खते घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे करोनाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परिसरात समाधानकारक पाऊस झाला आहे. खरिपाच्या पेरण्या जवळपास पुर्ण झाल्या आहेत. शेतकऱ्यांना आता खतांची आवश्यकता आहे. त्यातच खतांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी खतांच्या दुकानांबाहेर सकाळी 6 वाजेपासुनच गर्दी करु लागले आहेत.

तळोदा येथील मेनरोडवर असलेल्या एका खताच्या दुकानांबाहेर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी गर्दी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी तोंडावर मास्क लावलेले नव्हते. तसेच सोशल डिस्टंसिंगचा पुर्णत: फज्जा उडताना दिसला. त्यामुळे करोनाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या