Friday, April 26, 2024
Homeनगरशेतकर्‍यांना खरीप, रब्बी कर्जाच्या अनुदानाचा लाभ मिळवून द्या

शेतकर्‍यांना खरीप, रब्बी कर्जाच्या अनुदानाचा लाभ मिळवून द्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा बँक ही केंद्र सरकारच्या योजना शेतकर्‍यांसाठी राबवणारी राज्यातील पहिली बँक आहे. करोना संकटाच्या काळामध्ये शेतकरी हवालदिल झाला होता.

- Advertisement -

शेतकर्‍याला आर्थिक मदत व्हावी व शेती व्यवसायासाठी लागणारी मदत म्हणून खेळते भांडवलाच्या रूपाने देण्याचे काम मागील संचालक मंडळाने घेतल्यामुळे सर्वात जास्त 129 कोटी रुपयांचा लाभ नगर तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळाला. मागील वर्षी जिल्ह्याला खरीप व रब्बी पिकासाठी 15 हजार कोटी रुपयांची कर्ज माफी मिळाली होती. यावर्षी कर्ज माफीसाठी केंद्रसरकारकडे पाठपुरावा करू. 31 मार्चपर्यंत कर्ज वसुली होणे गरजेचे असून शेतकर्‍यांनी खरीप व रब्बी पिकासाठी शून्य टक्के व पशुपालन खेळते भांडवलाचे कर्ज भरून केंद्र सरकारच्या 3 टक्के अनुदान मिळवावे, यासाठी शेतकर्‍यांनी कर्ज भरावे, असे आवाहन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

तालुक्यातील शेतकर्‍यांनी घेतलेल्या रब्बी, खरीप व पशुपालन खेळते भाडवंल कर्ज वसुली संदर्भातील सचिव व शाखाधिकाराच्या बैठकीत कर्डिले बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, सुधाकर वर्पे, आनंदराव शेळके, रामदास सोनवणे, इस्माईल शेख, महादेव कराळे, शैलेश बोधले आदी उपस्थित होते. कर्डिले म्हणाले, सभासद शेतकर्‍याने थकबाकी न भरल्यास त्याला केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार नाही व सोसायटी निवडणुकीमध्ये मतदानापासून वंचित राहावे लागेल.

तसेच जादा दराने व्याज भरावे लागेल. यासाठी नगर तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांनी घेतलेले कर्ज मार्चअखेर भरून कारखानदारांना दाखवून द्या की आम्ही प्रामाणिक आहोत. मार्चनंतर पुन्हा करोना काळामध्ये शेतकरी अडचणीत आहे. अजूनही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी नाबार्डची ही योजना पुढे चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

कारखानदार शेतकर्‍यांची वसूली करण्यासाठी नियम लावतात. तेच नियम कारखानदारांना यापुढे लावले जातील. जिल्हा बँंक ही आता राज्य सरकारच्या ताब्यात नसून रिझर्व बँकेकडे गेली आहे. सचिवांनी व शाखा अधिकारी यांनी शेतकर्‍यांना घेतलेल्या कर्जाची सविस्तर माहिती द्यावी व लाभ कसा होईल हे सांगावे.

जिल्ह्यातील कारखानदार व प्रस्थापित पुढार्‍यांनी मला राजकारणातून संपवण्यासाठी खुप प्रयत्न केले. खोट्या नाट्या केसेस केल्या त्यातून बाहेर आलो. जनतेच्या व शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी अहोरात्र काम करीत आहे. मला चेक देण्यासाठी जन्माला यायचाय. या सर्वांच्या नाड्या माझ्याजवळ आहेत. यांना राजकारणात पुरून उरेल एवढी क्षमता माझ्यात आहे. मी कधीही बेकायदेशीर काम करत नाही. जे काही काम करतो ते नियमात करतो. बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांनाच लाभ होईल यासाठी संघर्ष करीत राहील, असेही कर्डिले म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या