Thursday, April 25, 2024
Homeनगरशेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 75 हजारांची मदत द्या

शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 75 हजारांची मदत द्या

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यात सरासरीपेक्षा यंदा दुप्पट अतिवृष्टी झाली असल्याने खरीप हंगामातील सर्वच पिके पाण्यात गेली आहेत. शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असून राज्य सरकारने पंचनामे करण्यात वेळ न घालवता सरसकट शेतकर्‍यांना किमान हेक्टरी 75 हजार रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याची माहिती काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष ,जिल्हा बँकेचे संचालक अनुराधा नागवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

श्रीगोंदा तालुका घोड, कुकडी कालवा तसेच नद्यांवर 72 टक्के क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. यावर्षी तालुक्यात उच्चांकी 725मिली मीटर पाऊस झाला असल्याने खरीप हंगामातील मूग, बाजरी, उडीद, सोयाबीन, कपाशी, तूर, कांदे, मका आदी पिकांसह फळबागा लिंबू, द्राक्षे, डाळिंब ,संत्रा तसेच नगदी पीक असलेल्या उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी असल्याने व पाऊस कमी होत नसल्याने अजून दीड ते दोन महिने तरी पुढील पिके घेता येणार नाहीत.

याचा परिणाम शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर झाला असल्याने ऐन दिवाळीत शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून शेतातील पिकांच्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा सरकारने तातडीने शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी किमान 75 हजार रुपये देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटून करणार असल्याचे अनुराधा नागवडे यांनी सांगितले. यावेळी कारखाना संचालक प्रशांत दरेकर, सरपंच आदेश नागवडे, योगेश भोईटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धर्मनाथ काकडे आदी उपस्थित होते.

आ. पाचपुतेंनी ठोस भूमिका घ्यावी

श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते हे अनुभवी आहेत. राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार असताना ते सरकारकडे शेतकर्‍यांसाठी अजून कसलीही मागणी करताना दिसत नाहीत. नागवडे परिवार शेतकरी दुःखात असल्याने दिवाळी सण करणार नाही. सरकारने शेतकर्‍यांना मदत दिली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या