Saturday, May 4, 2024
Homeनाशिकवटवाघळांमुळे शेतकरी हैराण; द्राक्षबागांचे नुकसान

वटवाघळांमुळे शेतकरी हैराण; द्राक्षबागांचे नुकसान

पिंपळगाव ब.। वार्ताहर Pimpalgaon Baswant

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) परीसरात द्राक्षहंगाम (Grape season) सुरू होत असतांनाच परिसरात वटवाघळांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले असून

- Advertisement -

ही वटवाघळे रात्रीच्या वेळेस द्राक्षबागांवर येत असून विक्रीस आलेल्या द्राक्षांची नासाडी करीत आहेत. त्यामुळे वटवाघळांच्या (bats) धास्तीने शेतकर्‍यांच्या (farmer) तोंडचे पाणी पळाले असून हातात आलेले लाखो रुपये किमतीचे पीक वाया जावू लागले आहे.

पिंपळगाव परिसरातील शेतकर्‍यांनी मामा जेम्बो, फ्लेम, शरद सीडलेस, नानासाहेब परपल आदी निर्यातक्षम द्राक्षांचे (Exportable grapes) उत्पादन घेतले. त्यासाठी रात्रीचा दिवस करीत या पिकासाठी लाखो रुपये खर्च केले. आता सदरची द्राक्षे व्यापार्‍यास देण्यात आली आहे. व्यापारी वर्गाकडून ही द्राक्षे 70 ते 115 रु. बाजारभावाने खरेदी केली जात आहे.

त्यामुळे या हंगामात द्राक्षे पिकातून दोन पैसे जास्त मिळून मागील हंगामात झालेले नुकसान भरून काढता येईल ही अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र यावर्षी नवे संकट उभे ठाकले आहे. रात्रीच्या वेळेस सुमारे 25 ते 50 च्या संख्येने वटवाघळे द्राक्ष पिकांवर बसून द्राक्ष घडांचे नुकसान करू लागले आहे.

यावर उपाय म्हणून अनेक शेतकर्‍यांनी बागेवर जाळ्या बसविल्या तर काही शेतकरी रात्रीचा घंटानाद करण्याचा प्रयोग राबवित आहेत. मात्र त्याचाही फारसा उपयोग होत नसल्याने हातात आलेले पीक वाचविण्यासाठी शेतकर्‍याला कसरत करावी लागत आहे.

मागील वर्षी माझ्या बागेवर असेच वटवाघळे नुकसान करत होते. घंटानाद चा प्रयोग देखील केला. परंतु त्याला वटवाघळांनी दाद दिली नाही. त्यामुळे यावर्षी मी द्राक्षबागेवर जाळी टाकून बागेचा वटवाघळांपासून बचाव केला आहे.

स्वप्निल भंडारे, द्राक्ष उत्पादक शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या