Saturday, April 27, 2024
Homeनाशिकशेतकरी फसवणूक प्रकरणी त्र्यंबक पोलिसांत गुन्हा दाखल

शेतकरी फसवणूक प्रकरणी त्र्यंबक पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक । Nashik

द्राक्ष खरेदी केल्याचे पैसे न देता फसवणूक केल्याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत त्रंबक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तानाजी हरिभाऊ खांडबहाले ( 43, रा. महिरावणी, तालुका जिल्हा नाशिक) यांनी संशयित अमित अरुण देशमुख (रा. शाजापूर, मध्य प्रदेश), भूषण दिलीप पवार ( रा. विद्यानगरी देवपूर, धुळे ), विशाल मारुती विभुते (रा. धुळे), अमोल अविनाश चव्हाण(रा. कोथरूड,पुणे), सागर गजानन जगताप (रा. बारामती,पुणे), संतोष तुकाराम बोराडे(रा. निफाड, नाशिक) यांनी खांडबहाले यांचेकडून त्यांच्या शेतातील 5534 किलो द्राक्ष 41 रुपये प्रति किलो दराने विकत घेतले.

त्यापोटी त्यांना 2 लाख 16 हजार 585 रुपयांचा धनादेश दिला अद्यापपर्यंत त्यांनी सदर धनादेश बँक खात्यावर पैसे नसताना दिल्याने खांडबहाले यांनी वारंवार पैशाची मागणी केली असता त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी त्रंबक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. पांढरे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या