Friday, April 26, 2024
Homeनगरनुकसानग्रस्तांना मदतीचा दुसरा हप्ता तालुक्याला वर्ग

नुकसानग्रस्तांना मदतीचा दुसरा हप्ता तालुक्याला वर्ग

296 कोटी : जवळपास सर्व बाधित शेतकर्‍यांना भरपाई मिळण्याचा जिल्हा प्रशासनाला विश्‍वास

अहमदनगर (प्रतिनिधी)- सप्टेंबर-नोव्हंेंबर महिन्यांत अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे 475 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत जिल्हा प्रशासनाने मदतीचा अहवाल तयार करून सरकारकडे भरपाईसाठी पाठविला होता. त्यानुसार सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीच्या दुसर्‍या टप्प्यातील 296 कोटी 20 लाखांचा निधी जिल्ह्यासाठी पाठविला असून हा निधी जिल्हा प्रशासनाने तालुका पातळीवर वर्ग केेला आहे. यापूर्वी पहिला टप्प्यातील 135 कोटी 55 लाख रुपयांचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.

- Advertisement -

सप्टेंबर-नोव्हंेंबर महिन्यांत जिल्ह्यात अवेळी आणि अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनातर्फे जिरायती, बागायती आणि फळबागा मिळून 4 लाख 54 हजार हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. फटका बसलेल्या शेतकर्‍यांची संख्या 6 लाख 34 हजार 33 आहे. जिल्ह्यातील नुकसानीचा हा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनदरबारी होता. त्यानुसार नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून 135 कोटी 55 लाख रुपयांचे अनुदान गेल्या महिन्यात जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले होते. हे अनुदान शेतकर्‍याच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने सरकारकडे भरपाईची मागणी करतांना बागायात भागासाठी आणि फळबागांसाठी 13 हजार 500 आणि जिरायत भागासाठी 6 हजार 800 प्रमाणे मागणी केली होती. मात्र, सरकारने फळबागा आणि बागायत भागासाठी सरकट 18 हजार आणि जिरायत भागासाठी 8 हजार रुपये हेक्टरप्रमाणे अनुदान पाठविले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने भरपाईची एकूण केलेल्या मागणी पेक्षा कमी पैसे लागणार असून आलेल्या दुसर्‍या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व बाधीतांना भरपाई मिळणार असल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाला आहे.

अशी आहे रक्कम
नगर 15 कोटी 68 लाख, अकोले 20 कोटी 39 लाख, जामखेड 3 कोटी 19 लाख, कर्जत 17 कोटी 16 लाख, कोपरगाव 19 कोटी 67 लाख, नेवासा 24 कोटी 44 लाख, पारनेर 13 कोटी 93 लाख, पाथर्डी 41 कोटी 93 लाख, राहुरी 19 कोटी 46 लाख, संगमनेर 25 कोटी 60, शेवगाव 36 कोटी 48, श्रीगोंदा 20 कोटी, श्रीरामपूर 19 कोटी 64, राहाता 18 कोटी 17 लाख असा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या