Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकदिंडोरी : बळीराजाची नजर आभाळाकडे

दिंडोरी : बळीराजाची नजर आभाळाकडे

ननाशी | Nanashi वार्ताहर

पावसाचे माहेरघर असलेल्या ननाशी परिसरात ऐन पावसाळ्यात पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी हवालदिल झाले असून हंगाम वाया जातो की काय, अशी भीती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे.

- Advertisement -

पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी अद्याप परिसरात दमदार पाऊस झाला नाही. वळीव पाऊस वगळता दमदार मोसमी पावसाला अजूनही सुरुवात झाली नाही. पाऊस जसजसा लांबणीवर पडत आहे. तसतशी बळीराजाची चिंता वाढत आहे.

या परिसरात प्रामुख्याने भात,नागली, वरई, उडीद, खुरासनी, कुळीद असे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे पिके घेतली जातात. पाऊस लांबल्याने या पिकांना मोठा फटका बसत आहे. काही शेतकर्‍यांनी सुरुवातीला झालेल्या वळीव पावसानंतर नागली, वरई आदीची रोपे टाकली होती.

ती आता लावणी योग्य झाली आहे पण पावसाअभावी या पिकांची लावणी खोळंबली आहे तर ज्या शेतकर्‍यांनी पाऊस पडेल या आशेवर नागली व वरईची लावणी केली आहे. ती पिके कडक उन्हामुळे करपत आहे तर भात लावणी ठप्प झाली आहे.

विज पंप आणि पाण्याची सोय आहे अशा शेतकर्‍यांनी विजपपांच्या मदतीने पाणी भरून भात लावणी केली आहे, त्यातही पीक जगेल की नाही याबाबत सांशकता आहे. जुलै महिन्यात या परिसरात संततधार पाऊस होतो. अनेकदा पावसामुळे जनजीवन विस्कळीत होते.

यंदा मात्र जुलैमध्येही कडक उन्हाळा जाणवत आहे. या कडक उन्हाचा मोठा फटका पिकांना बसत असून, उत्पादनावरदेखील मोठा परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे आदिवासी शेतकर्‍यांची आतापासूनच घालमेल सुरू झाली आहे.

तब्बल दीड- दोन महिन्यांचा कालावधी पावसाअभावी वाया गेल्याने आता लावणी करूनही उत्पादन कमालीची घटण्याची शक्यता निर्माण झाल्याने दुबार लावणी करायची म्हटले तर रोपे शिल्लक नसल्याने तेही शक्य नसल्याचे मत परिसरातील शेतकर्‍यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या