Friday, April 26, 2024
Homeनाशिकशेतकऱ्यांनो! पाणी हवंय? मग करा अर्ज

शेतकऱ्यांनो! पाणी हवंय? मग करा अर्ज

नाशिक | Nashik

सर्व प्रकल्पांवरील जलाशय, नदी व गोदावरी कालवे (Godawari Canal) या प्रकल्पांवरील लाभार्थी शेतकर्‍यांनी व पाणीवापर संस्थांनी पाण्याचा लाभ घेण्यासाठी आपले पाणी अर्ज १४ ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे (Nashik Irrigation Department) उपकार्यकारी अभियंता अ.रा.निकम यांनी केले आहे.

- Advertisement -

नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील दारणा (Darna), गंगापुर (Gangapur), गौतमी गोदावरी (Gautami Godawari), कश्यपी, आळंदी जलाशय उजवा व डावा कालवा, पालखेड उजवा, कडवा जलाशय व कालवा, भावली, मुकाणे, वाकी, भाम, वालदेवी आदी प्रकल्प आहेत.

पाऊस पडुन धरणात पाणीसाठा उपलब्ध होईल, त्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या अनुमानानुसार व नियोजना नुसार २०२१-२०२२ खरीप हंगामातील विहिरीवरील उभी पिके व पेरणी झालेली चारा, अन्नधान्य, कडधान्य व तेलबियांची पिके यांना नमुना नंबर ७ च्या अटी व शर्तीनुसार पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.

या करिता लाभार्थी शेतकर्‍यांनी व पाणीवापर संस्थांनी सिंचन शाखा कार्यालयात पाणी अर्ज सादर करून रितसर पोहोच पावती घ्यावी, लाभार्थी शेतकर्‍यांना व पाणीवापर संस्थांना धरणांमध्ये जसजसा पाणी साठा उपलब्ध होईल. त्याप्रमाणे शासन व वरिष्ठ कार्यालयाचा जो निर्णय होईल त्यानुसार पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

पाण्याचा पुरवठा करत असतांना पाऊस किंवा धरणातील पाणीसाठी कमी झाल्यास अथवा आपत्ती म्हणून पिण्याचे पाणी राखुन ठेवण्यासाठी आवश्यकता भासल्यास अशा वेळी दिलेले परवाने किंवा मंजूरी रद्द करण्यात येतील.

याबाबत कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही. त्या अनुषंगाने न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या