Thursday, April 25, 2024
Homeजळगावपोळ्याच्या दिवशी शेतकर्‍याची आत्महत्या

पोळ्याच्या दिवशी शेतकर्‍याची आत्महत्या

जळगाव -Jalgaon – प्रतिनिधी :

तालुक्यातील विटनेर येथील 40 वर्षीय शेतकर्‍याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली.

- Advertisement -

मनोज धनराज परदेशी (वय 40) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, विटनेर येथील मनोज परदेशी यांच्या नावावर तीन लाखांचे कर्ज आहे. ते शेतात गेले असता मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांनी विष घेतल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले.

त्यांनी तातडीने डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मनोज परदेशी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या