Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकर्‍यांच्या मुलांना ड्रोन प्रशिक्षण

शेतकर्‍यांच्या मुलांना ड्रोन प्रशिक्षण

मुंबई | Mumbai

राज्य शासनातर्फे शेतकर्‍यांच्या मुलांना आणि ग्रामीण सुशिक्षित बेरोजगारांना शेती कामासाठी ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

- Advertisement -

मंत्री सत्तार म्हणाले, ड्रोन चालवणार्‍याला आम्ही पायलट म्हणणार आहोत. त्याला राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जाणार आहे. विद्यापीठावर आम्ही ही जबाबदारी सोपवली असून, तिथे ड्रोनचं काम सुरू आहे. ड्रोनचे ऑपरेटर गावांमध्ये असतील, गावातील पाच तरुणांनी मिळून जर ड्रोन घेतला तर निश्चतच रोजगारही उपलब्ध होईल. यासाठी सबसिडीही दिली जाईल.

प्रशिक्षणात शेतकर्‍यांची मुलं किंवा सुशिक्षित बेरोजगार सहभाग घेऊ शकतील. ड्रोनची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही. विविध कंपन्यांनी ड्रोन तयार केले आहेत. राहुरी विद्यापीठात सरकारकडूनही ड्रोन निर्मितीवर काम सुरू आहे. सबसिडीसह बँकेत कर्ज घेतानाही आम्ही त्यांना मदत करणार आहोत.

शेतकर्‍यांच्या वीज बिलाच्या मुद्य्यावर मंत्री सत्तार म्हणाले, केवळ चालू बील भरावं, असा सरकारचा स्पष्ट आदेश आहे. कोणतही थकीत बील मागू नये, जुन्या बिलाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो होईल. परंतु चालू बील भरावं एवढेच आदेश आहेत, कॅबिनेटमध्ये यावर सविस्तर चर्चा झाली आहे. सर्वांच्या समोर उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मंत्रालयाच्या सर्व सचिवांनाही आदेश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या