Tuesday, April 23, 2024
Homeनगरशेततळे योजनेच्या रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न मार्गी- आमदार काळे

शेततळे योजनेच्या रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न मार्गी- आमदार काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकर्‍यांचे कृषी विभागाअंतर्गत असलेल्या शेततळे योजनेचे अनुदान रखडले होते. याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन रखडलेले अनुदान तातडीने शेतकर्‍यांना मिळावे अशी मागणी केली होती. त्या मागणीचा कृषी विभागाने सकारात्मक विचार करून मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी 52.50 कोटी निधी राज्यासाठी मंजूर केला आहे. या निधीतून कोपरगाव तालुक्यातील ज्या शेतकर्‍यांचे अनुदान प्रलंबित होते अशा शेतकर्‍यांना लवकरच अनुदान मिळणार असून कोपरगाव तालुक्यातील शेतकर्‍यांच्या रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

- Advertisement -

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक शेतकर्‍यांनी मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये सहभाग घेतलेला होता. बहुतांशी शेतकर्‍यांना या योजनेचे अनुदान मिळालेले होते. मात्र 2019-20 या वर्षातील 69 लाभार्थी शेततळ्याच्या अनुदानापासून वंचित होते. या शेतकर्‍यांना रखडलेले अनुदान मिळवून देण्यासाठी कृषी विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट घेवून शेतकर्‍यांच्या अडचणी मांडून रखडलेले अनुदान तातडीने मिळावे अशी शेतकर्‍यांच्या वतीने मागणी केली होती. त्या मागणीची कृषी विभागाने दखल घेवून मागेल त्याला शेततळे योजनेसाठी संपूर्ण राज्याला 52.50 कोटी निधी मंजूर केला आहे. या निधीतून 2017, 2018, 2019 व 2020-21 मध्ये पूर्ण झालेल्या शेततळ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील 69 लाभार्थी शेतकर्‍यांचे जवळपास 33 लाख 76 हजार एवढी बाकी असलेली रक्कम मिळणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या