Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशिरसगावला शेती लिलाव हाणून पाडला

शिरसगावला शेती लिलाव हाणून पाडला

कसबे सुकेणे। वार्ताहर Kasbe sukene

निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे शेतकर्‍यांच्या शेतीची जाहीर लिलाव प्रक्रिया जिल्हा बँक करत असताना या लिलावावेळी शेतकरी संघर्ष संघटनेने लिलावाला तीव्र विरोध करत हा लिलाव हाणून पाडला.

- Advertisement -

शिरसगाव येथील विकास सोसायटीच्या कार्यालयात जिल्हा बँकेचे कर्ज थकबाकीदार शेतकरी सूर्यभान पंढरीनाथ मोरे, राजेंद्र दत्तात्रय मोरे, संजय शिवाजी मोरे, वसंत विठ्ठल आहेर या चार शेतकर्‍यांचा शेती लिलाव नाशिक जिल्हा बँकेचे अधिकारी करत असताना या लिलावाला शेतकरी संघर्ष संघटनेकडून विरोध केला. दरम्यान, याच गावात गेल्या 3 ऑगस्टला जयराम सुखदेव मोरे या शेतकर्‍याच्या शेतीचा लिलाव जिल्हा बँकेने केला होता.

या गावात सोसायटीत तलाठी, महसूल अधिकारी, बँकेचे अधिकारी, ग्रामसेवक हे या शेतकर्‍यांच्या लिलावाची प्रक्रिया करत होते. त्यामुळे शिरसगावचे निफाड तालुक्यातील थकबाकीदार शेतकरी संतप्त झाले. शेतकरी संघर्ष संघटनेच्या सर्व नेत्यांनी आंदोलनस्थळ सोडून तत्काळ शिरसगाव गाठले व शेतकर्‍यांनी एकत्र येऊन वरील शेतकर्‍यांचा शेतीचा लिलाव हाणून पाडला.

यावेळी जिल्हा बँकेचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकरी नेते धनंजय पाटील काकडे, शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, शेतकरी संघर्ष संघटनेचे सुधाकर मोगल यांनी उपस्थित थकबाकीदार शेतकर्‍यांना शेतकरी विरोधी कायदे, लिलाव होणार्‍या शेतीचे कायदे, इतर माहिती व पुढील शेतकरी व्यवस्थेसाठी संघर्ष करण्याची भूमिका समजून सांगितली. शिरसगाव येथे शासनाने पुकारलेला शेतीचा लिलाव सर्वच शेतकर्‍यांच्या ताकदीने एकत्र येऊन हाणून पाडला.

याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे, अक्षय मोरे, उमेश मोरे, सुरेश मोरे, पुंडलिक आव्हाड, भाऊसाहेब तासकर, रामदास आहेर, राजेंद्र मोरे, अण्णासाहेब मोरे, संजय मोरे, गिरीश जाधव, अनिल मोरे, शंकर भडांगे, प्रकाश कराटे, शांताराम मोरे, शिवाजी मोरे, सागर मोरे आदींसह शिरसगाव परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एका बाजूला निसर्गाचा लहरीपणा तर दुसर्‍या बाजूला शासनाचे शेतकर्‍यांकडे होणारे दुर्लक्ष त्यातच जिल्हा बँकेकडून होणारी शेतकर्‍यांची पिळवणूक यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक बनली आहे. जिल्हा बँकेने या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.

सूर्यभान मोरे, थकबाकीदार शेतकरी, शिरसगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या