Tuesday, April 23, 2024
Homeनाशिककरंजवण येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

करंजवण येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

ओझे l प्रतिनिधी

मविप्र (MVP) समाज संस्थेच्या जनता विद्यालय (Janata Vidyalay) व उच्च माध्यमिक विद्यालय करंजवण (ता. दिंडोरी) येथे  बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला, याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च शालेय समिती अध्यक्ष पंढरीनाथ बर्डे (Pandharinath Barde) हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्ष रविंद्र मोरे, अभिनव शालेय समिती अध्यक्ष भगवान कोंड तसेच सदस्य जयदिप देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. गीतमंच च्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. एन. आर. जगताप यांनी केले तर सूञसंचलन श्रीमती के. एम. विरकर यांनी केले.

विदयार्थी मनोगत कु. कोमल मोरे, कु. कामिनी गवळी,  कु. स्वप्नाली शार्दूल, शिवाजी पांडे तसेच प्रतिक बर्डे यांनी व्यक्त केले. शिक्षक मनोगत प्रा. श्री. एन आर जगताप, प्रा. श्री पगार व्ही के  श्रीमती पाटील एस आर, प्राचार्य किरण बैरागी आदींनी व्यक्त केले.

शालेय समिती सदस्य जयदिप देशमुख शालेय समिती (School Committee) अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी मनोगत व्यक्त केले व मार्गदर्शन केले याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात पंढरीनाथ बर्डे यांनी प्रथम क्रमांक मिळविणा-या विद्यार्थ्यांसाठी 1100 रूपयांचे बक्षीस जाहीर केले.

विद्यालयाचे पर्यवेक्षक पी.आर.गायकवाड तसेच शालेय समिती सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.जाधव जी.के श्री रमेश ठेपणे, उत्तम तुंगार यांनी परिश्रम घेतले .आभार श्रीमती योगिता बस्ते यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या