Wednesday, April 24, 2024
Homeनगरफॅन्सी, विनानंबर वाहन चालकांवर कारवाई

फॅन्सी, विनानंबर वाहन चालकांवर कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पैशाची बॅग (Bag of money), सोनसाखळी चोरी (Gold Chain Theft), जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगार (Criminals) विना नंबर तसेच फॅन्सी नंबर प्लेट (Fancy Number Plate) असलेल्या दुचाकी वापरत असल्याने जिल्हा पोलिसांकडून अशा वाहन चालकांविरोधात नाकाबंदी करून कारवाई करण्यात येत आहे. मागील 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहिम राबवून जिल्ह्यातील 348 वाहन चालकांविरोधात कारवाई करून एक लाख तीन हजार 200 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दुचाकी वाहन चालकांकडून वाहनाचा नोंदणी क्रमांक (Vehicle Registration Number) आकर्षक दिसावा, यासाठी ‘दादा’, ‘मामा’, ‘भाई’ अशा नंबर प्लेटसह नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट लावण्यात येत आहे. तसेच चोर्‍यामार्‍या करणार्‍या सराईत गुन्हेगारांकडून विना नंबर (Number), फॅन्सी नंंबर प्लेट (Fancy Number Plate) असलेल्या वाहनांचा वापर होत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांच्या निदर्शनास आले आहे. अशा वाहन चालकांविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा पोलिसांना दिल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांकडून (Police) ठिकठिकाणी नाकाबंदी करून फॅन्सी (Fancy) व विना नंबर प्लेट दुचाकीवर (Bike without Number Plate) कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 348 जणांकडून एक लाख तीन हजार 200 रूपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती नगर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले (Traffic Branch Police Inspector Rajendra Bhosale) यांनी दिली.

वाहन चालकांनी परिवहन विभागाकडील नियमानुसार आपले वाहनांवर नंबर प्लेट लावुनच वाहन चालवावे. यापुढे देखील विना नंबर व फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहन चालकाविरूद्ध प्रचलित कायद्यान्वये योग्य ती कायदेशीर कारवाईची मोहिम सुरू राहणार असल्याचे जिल्हा पोलिसांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या