Friday, April 26, 2024
Homeनगरनगरमध्ये करोनाचा खोटा अहवाल

नगरमध्ये करोनाचा खोटा अहवाल

अहमदनगर (प्रतिनिधी) –

एका वृद्धाची खोटी व बनावट करोना आरटीपीआर चाचणी दाखविल्या प्रकरणी विळद घाटातील कृष्णा डायग्नोस्टिक सेंटरच्या प्रभारी अधिकारी,

- Advertisement -

टेक्नीशीयन अधिकारी व संबंधित कर्मचार्‍याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक बबनराव खोकराळे (रा. पाईपलाईन रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. करोना काळात बोगस चाचणी दाखवून पैसा कमविण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशोक खोकराळे यांचे वडील बबनराव खोकराळे यांच्या घशात खवखव होत असल्याने त्यांना 14 ऑगस्ट रोजी पटीयाला कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले. त्याठिकाणाहून डॉ. बहुरूपी व डॉ. बोरकर यांनी बबनराव खोकराळे यांना न्यूक्लीअस रुग्णालयात दाखल केले. वडिलांना करोना झाला असल्याचे अशोक यांना रुग्णालयाकडून सांगण्यात आले. यानंतर वडिल मयत झाल्याचे अशोक यांना रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

वडिलांच्या करोना रिपोर्टबाबत अशोक खोकराळे यांना शंका आल्याने त्यांनी विळद येथील कृष्णा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये चौकशी केली. यावेळी बबनराव खोकराळे यांच्या दोन बोगस करोना चाचण्या केल्या असल्याची बाब अशोक यांच्या लक्षात आली. 13 ऑगस्ट व 14 ऑगस्ट रोजी दोन हजार 200 रूपये भरून दोन चाचण्या केल्या व मोबाईल नंबर वेगवेगळे दाखविले गेल्याची बाब अशोक खोकराळे यांच्या लक्षात आली. कृष्णा डायग्नोस्टिकच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बोगस व खोटे रिपोर्ट करून आमची फसवणूक केली असल्याचे अशोक खोकराळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधोर करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या