Tuesday, May 14, 2024
Homeनगरखोट्या कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीस फसविले

खोट्या कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीस फसविले

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

खोटा दस्तऐवज तयार करून खरे असल्याचे भासवून कागदपत्रांच्या आधारे मोटार अपघात दावा कोपरगाव न्यायालयात दाखल केल्या प्रकरणी

- Advertisement -

अ‍ॅड. मंगला राजेश कोठारी रा. श्रीरंग अपार्टमेंट, गुज्जर गल्ली अहमदनगर व नंदकुमार छोटुलाल खिच्ची रा. सावळीविहिर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरील आरोपींनी 22 फेब्रुवारी 2000 रोजी खोटा गुन्हा दाखल करून न्यायालय व इन्शुरन्स कंपनीची फसवणूक केली होती. सदर मोटार अपघात दावा प्रकरणातील 369/2002 या दावा प्रकरणात समाविष्ट असलेली फिर्याद घटनास्थळ, पंचनामा इत्यादी शासकीय दस्तावेज बनावट व खोटा तयार करून ते खरे असल्याचे भासवून या कागदपत्रांच्या आधारे अपघात दावा प्राधिकरण कोपरगाव यांच्या न्यायालयात 22 फेब्रुवारी 2000 रोजी दाखल करून न्यायालय व इन्शुरन्स कंपनीची फसवणूक केली.

याबाबत गुन्हा नोंदणी क्रमांक 827/2020 भादंवी कलम 420, 466, 468, 471, 34 प्रमाणे स. पो. नि. दीपक आंबादास बोरसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या