Friday, April 26, 2024
Homeनाशिकखोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावे

खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावे

सातपूर । प्रतिनिधी Satpur

सीटूचे सरचिटणीस कॉ. देविदास आडोळे याच्यावर तडीपारीची नोटीस बजावली आहे.

- Advertisement -

याचा प्रखरपणे विरोध करत कामगार रस्त्यावर उतरले. पोलीस प्रशासनाची ही पूर्वग्रहदूषीत कारवाई असून, फँब कंपनीतील कामगारांवर अमानुष मारहाण करणारे पोलीस अधिकार्‍यांना त्वरित निलंबित करावे व कामगारांवरील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावे, अशा मागण्या सातत्याने मांडल्याबद्दल आडोळे यांच्यावर जाणीवपूर्वक तडीपारीची कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप सीटूतर्फे करण्यात आला आहे.

तसेच डायनॅमिक प्रेस्टीस कंपनीतील कामगारांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी कंपनी प्रशासन व संजय बुटे यांच्यावर त्वरित कारवाई करावी. या मागणीसाठी हजारो कामगारांद्वारे गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला.

याप्रसंगी सीटूचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष कॉ. सिताराम ठोंबरे, देविदास आडोळे, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, कल्पनाताई शिंदे, सिंधुताई शार्दुल, संतोष काकडे, मुकुंद रानडे, तुकाराम सोनजे, हरिभाऊ तांबे, मोहन जाधव, निवृत्ती केदार आदींसह कामगार संघटना पदाधिकारी व विविध कारखान्यातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या