Thursday, April 25, 2024
Homeनगरबनावट क्रिडा सर्टीफिकेट प्रकरणी टाकळीभानच्या गाढेला अटक

बनावट क्रिडा सर्टीफिकेट प्रकरणी टाकळीभानच्या गाढेला अटक

श्रीरामपुर |प्रतिनिधी| Shrirampur

खेळाचे बनावट सर्टीफिकेट बनवून अनेक तरुणांना नोकरीचा लाभ मिळवून देऊन माया जमवणारा

- Advertisement -

टाकळीभानचा रहिवाशी असलेला रमेश शशिकांत गाढे नागपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून नागपूर पोलिसांनी त्याला राहत्या घरातून जेरबंद केले आहे.

बनावट क्रिडा प्रमाणपत्र तयार करून त्याची विक्री करून पैसा कमावण्याचा गोरख धंदा गेल्या काही वर्षांपासून सुरू होता. टाकळीभान येथील रमेश शशिकांत गाढे हा राहुरी कृषी विद्यापिठात नोकरीस आहे. बनावट क्रिडा प्रमाणपत्र बनवून तो विक्री करत होता. खेळाच्या दर्जानुसार 1 लाख ते 4 लाखांपर्यंत तो त्या प्रमाणपत्राची विक्री करीत होता.

नागपूर पोलिसांना या बनावट प्रमाणपत्राची माहिती मिळाल्याने त्यांनी शेवगाव येथील रमेश याचा साथीदार बबन गायकवाड याच्या राहत्या घरी छापा टाकून त्याला अटक केली होती. बबन याच्या माहितीनुसार नागपूर पोलिसांनी मंगळवारी पहाटे तीन वाजता रमेश याला राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. चौकशीसाठी त्याला नागपूर येथे नेण्यात आले आहे.

नेटबॉल, रोप स्कीपिंग, कराटे व इतर खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र विक्री करून तरुणांना सरकारी नोकरीचा लाभ मिळत असल्याने अनेक तरुण त्याच्या जाळ्यात अडकले आहेत. बनावट प्रमाणपत्रांची विक्री करून रमेश याने अमाप संपत्ती कमावली असल्याचे बोलले जात आहे. राहुरी विद्यापिठात शुल्लक पगाराची नोकरी करणारा रमेश करोडोचा धनी झाला असून अनेक ठिकाणी त्याने मालमत्ता उभी केलेली असल्याचे बोलले जात आहे.

नागपूर पोलिसांच्या चौकशीअंती या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे? हे समजणार आहे. त्यानंतर रमेशने जमवलेल्या मायेचा खरा छडा लागणार आहे. टाकळीभान येथे दबक्या आवाजात या प्रकरणाची चर्चा सुरू असून येथीलच त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का? असा सवाल केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या