Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशरेल्वेत नोकरीच्या नावाने 50 जणांची फसवणूक

रेल्वेत नोकरीच्या नावाने 50 जणांची फसवणूक

नवी दिल्ली | New Delhi –

रेल्वे न्यायालयात नोकरी देण्याचे आमिष दाखवून 50 जणांना गंडा घातला आहे.

- Advertisement -

गुजरातच्या बडोदा शहर पोलिसांनी नोकरीच्या नावे फसवणूक करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटने तब्बल 1 कोटी लुटल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एसओजी टीमने तीन जणांना अटक केली आहे.

हे रॅकेट बडोदा, सूरत आणि वलसाडच्या भागात कार्यरत होते. या भागातील 50 जणांना फसविण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 14 महिन्यांत दुसर्‍यांदा या रॅकेटला पकडण्यात आले आहे. ही गँग लोकांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देत होती. रेल्वेमध्ये भरती निघाली असून त्यामध्ये थेट नोकरी देण्याचे आमिष दाखविण्यात येत होते. त्यांच्या बतावणीला बळी पडून अनेक तरुण रेल्वेमध्ये नोकरीसाठी अप्लाय करत होते आणि अनेक ठेकेदारांना पैसे देत होते. तसेच या टोळक्यांचा म्होरक्या तुषार पुरोहित होता. त्याच्यासोबत कुशल पारेश आणि दिलीप सोळंकी यांना पकडण्यात आले आहे. गँगने लोकांकडून कागदपत्रे तयार करण्यासाठी आणि मुलाखत त्यासोबतच परिक्षेत पास करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीमागे 4 ते 5 लाख रुपये हडप केले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे पुरोहित हा कंत्राटी पद्धतीवर रेल्वेत काम करत होता. त्यामुळे तो परीक्षेचा पेपर सेट करायचा. त्यासोबतच त्याला रेल्वेचे रबर स्टँप असलेले नियुक्तीपत्रही दिले जात होते. त्यामुळे आता रेल्वे अधिकार्‍यांचीही चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण पुरोहित हा एकट्यानेच करत होता की यामध्ये रेल्वे अधिकारी किंवा कर्मचार्‍यांचा देखील समावेश आहे याचा तपास केला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या