साकेगावच्या महिलेकडे सापडल्या बनावट नोटा

भुसावळ bhusaval। प्रतिनिधी

तालुक्यातील बहुचर्चित अशा साकेगाव (Sakegaon) येथे 100 व 200 रूपये दराच्या सुमारे 20 हजार रूपये किंमतीच्या बनावट नोटा (Fake notes) आढळून (found) आल्या असून भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी पर्दाफाश केला असून गावातील एका महिलेसह (woman) पहूर येथील एक इसम असे दोघांना अटक करून त्यांच्या जवळून 20 हजार रूपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.

याबाबत माहिती अशी की, 40 हजार रूपयांचे खरे चलन दिल्यावर 1 लाख रूपये किंमतीच्या बनावट नोटा दिल्या जात असल्याची गुप्त माहिती श्री.वाकचौरे यांना मिळाल्यानंतर खातरजमा करून एक पथक तयार करण्यात आले. त्या नुसार एक महिला या नोटा देत असल्याचे पुढे आले. पथकाने 1 हजार रूपये देवून डमी ग्राहक पाठविला त्या बदल्यात त्याला 15 हजाराच्या बनावट नोटा मिळाल्या. या नोटांचे क्रमांक सर्वच नोटांवर सारखेच होते व नोटा अगदी हुबेहूब वाटत होत्या.

उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विलास शेंडे यांनी अत्यंत गोपनीय पध्दतीने शन्नो नामक 35 वर्षीय महिलेस ताब्यात घेतले आहे. तिच्याकडून 20 हजार रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. शन्नोने दिलेल्या माहिती वरून जामनेर नजीक पहुर येथून हनिफ पटेल (वय 55) याला ताब्यात घेतले आहे.

या दोघांची तालुका पोलिस ठाण्यात चौकशी सुरू आहे. यांनी नोटा कुठून आणल्या का छापल्या? याचा तपास पोलिस करत आहे. या प्रकाराच्या चौकशीसाठी तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. एकीकडे ‘स्मार्ट व्हिलेज’ व्हावे यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करित असतांना दुसरीकडे मात्र गावाच्या नावाला बट्टा लावणार्‍या घटना अलीकडे घडत आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *