बनावट मद्य तस्करी रोखण्यासाठी मद्यनिर्मिती व्हॅट फस्ट पॉइंटला वाढवावा

jalgaon-digital
2 Min Read

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

परमिटरुम बियरबारवर आकारला जाणारा अतिरिक्त व्हॅट मद्य उत्पादन निर्मिती फस्ट पॉईन्टला वाढविल्यास वाईनशॉप दरात मद्यपींना परमीटमध्ये सहज मद्य उपलब्ध होऊन परराज्यातील बनावट अवैध मद्याची महाराष्ट्रात होणार्‍या तस्करीस आळा बसेल, अशी मागणी अहमदनगर जिल्हा बिअरबार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी केली आहे.

जाधव यांनी सांगितले, परमिटरुम बियरबार व्यवसायाला अवैध मद्यविक्रेत्यामुळे अखेरची घरघर लागली आहे. परमिटरुमला असणारा अतिरिक्त व्हॅट लावण्याऐवजी सरसकट व्हॅट उत्पादक फस्ट पॉईन्टला घेतल्यास शासनाच्या तिजोरीत वाढीव टॅक्सच्या रुपाने भर पडून एमआरपी दरात ग्राहकांना सहज मद्य उपलब्ध होवुन परराज्यातील बनावट अवैध मद्याची महाराष्ट्रात होणारी तस्करी आपोआप थांबेल.

जमा महसुली उद्दिष्ट वाढविण्याच्या दृष्टीने अवैध दारुनिर्मिती विक्री व वाहतूक करणार्‍या विरोधात आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना अवलंबण्याचे आदेश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनी अधिकार्‍यांना देऊन देखील अहमदनगर पोलीस कारवाईच्या तुलनेत उत्पादन शुल्कचे जेमतेम गावठी हातभट्टीवर पडलेल्या छाप्यातील दाखल गुन्हे कारवाईबाबत सांशकता निर्माण करणारे आहे. आज मितीला परमिटरुम बियरबारमध्ये एमआरपीवरती सातटक्के मार्जिन ठेवून विविध प्रकारचे कर लावल्याने उत्पन्न व खर्चाची ताळमेळ, शिल्लक, वजावट एक टक्काही राहत नसल्याने परमिट व्यवसायाला अखेरची घरघर लागली आहे, असे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

आज परमिटरुम असोसिएशनमध्ये फूट पाडून अधिकारी आपली पोळी भाजत आहेत. वाईनशॉप देशी विक्रेते यांना किरकोळ मद्य हातविक्रीचा परवाना असताना त्यांनी अवैध धंदे करणार्‍यांना घरपोहोच मद्य पुरविण्याचा समांत्तर व्यवसाय कोपरगाव तालुक्यात उभा केला असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *