Saturday, April 27, 2024
Homeधुळेधुळ्यात बनावट दारूच्या कारखाना उद्ध्वस्त

धुळ्यात बनावट दारूच्या कारखाना उद्ध्वस्त

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहरातील मिल परिसरातील शासकीय दुध डेअरीसमोर सुरु असलेल्या बनावट दारुच्या कारखान्यावर छापा टाकत कारवाई केली.

- Advertisement -

तेथून देशी, विदेशी बनावट दारूच्या बाटल्यासह 2 लाख 66 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

धुळे तालुक्यातील आर्वी शिवारातील हॉटेल चक्रधरजी द्वारका येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने काल छापा टाकला. त्यात देशी मद्यसाठा आढळून आले.

पथकाने संशयीत आरोपी विठ्ठल सुका बोरसे याला अटक केली. चौकशीत त्याने ही दारु विशाल प्रविण सोनवणे याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले.

त्यानुसार पथकाने मिल परिसरातील शासकीय दुध डेअरीसमोर राहणार्‍या विशाल प्रविण सोनवणे याच्या घराची तपासणी केली.

त्यावेळी घरात 5 हजार 500 रुपये किंमतीचे आयबी व्हीस्कीचे 550 रिकामे खोके, 5 हजार रुपये किंमतीचे मॅकडॉल व्हिस्कीचे 500 रिकामे खोके, 10 हजार रुपये किंमतीचे देशी दारु बाटलीचे 5 हजार पत्री बुच,15 हजार रुपये किंमतीचे विदेशी दारुच्या बाटलीचे 3 हजार पत्री बुच, 16 हजार 992 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारुच्या 8 हजार 496 रिकाम्या बाटल्या,1 लाख 24 हजार 800 रुपये किंमतीच्या देशी-दारु प्रिंन्स संत्राच्या 2400 बाटल्या,8 हजार 372 रुपये किंमतीच्या बनावट देशी दारु टँगो पंच 161 बाटल्या, 60 हजार 480 रुपये किंमतीच्या आयबी व्हीस्कीच्या 432 बाटल्या, 14 हजार 400 रुपये किंमतीच्या मॅकडॉल व्हिस्कीच्या 96 बाटल्या देशी विदेशी मद्याचे 1500 रुपयांचे अर्क, 2 हजार रुपये किंमतीचे 2 हीटर गण, 900 रुपये किंमतीचा स्पीरटचा वासाचा रिकामा ड्रम, 750 रुपये किंमतीचे 5 प्लास्टीक ड्रम व 1 हजार रुपये किंमतीचे 5 पत्र्याचे ट्रे असा एकुण 2 लाख 66 हजार 694 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत करण्यात आला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे निरिक्षक बी.एस.म्हाडीक, प्रभारी निरीक्षक बी.आर.नवले, दुय्यम निरीक्षक अमोल पाटील, टी.एस.देशमुख के.एन.गायकवाड, एस.एस.गोवेकर, आर.एन.सोनार, जे.बी.फुलपगारे, ए.व्ही.भडागे, के.एम.गोसावी, जी.व्ही.पाटील, डी.टी.पावरा, व्ही.बी.नाहीदे यांच्या पथकाने ही केली. तपास निरीक्षक बी.एस.म्हाडीक करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या