Monday, April 29, 2024
Homeनगरबनावट जमीन मालक दाखवून 50 लाखांची फसवणूक

बनावट जमीन मालक दाखवून 50 लाखांची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मयत झालेल्या व्यक्तीच्या जागी बनावट जमीन मालक दाखवून खरेदीदाराची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी

- Advertisement -

कोतवाली पोलीस ठाण्यात पाच जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश सुमतिलाल संचेती (रा. विनायकनगर, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वृषभ मेहुल भंडारी (रा. स्टेशन रोड, नगर), मोहित रपारिया (पूर्ण नाव माहित नाही, रा. आगरकरमळा, नगर), यांच्यासह जमीनमालक व त्याचे मुले म्हणून उभा राहिलेले तिघा तोतयांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महेश संचेती यांचे संचेती इस्टेट एजन्सी नावाचे जमीन खरेदी-विक्रीचे कार्यालय विनायकनगर येथे आहे. संचेती हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. ऋषभ भंडारी व मोहित रपारिया यांनी वाळुंज (ता. नगर) येथील जमिनीचा व्यवहार करण्यासाठी महेश संचेती यांच्यासोबत साठेखत केले.

प्रत्यक्षात मात्र या जमिनीचा मूळ मालक 9 ऑक्टोबर 2018 रोजी मयत झालेला आहे. ही बाब भंडारी व रपारिया यांना माहित होती. या दोघांनी संचेती यांना साठेखत करून देताना जमीन मालकाच्या जागी बनावट व्यक्ती तसेच मालकाच्या दोन मुलांच्या जागीही बनावट व्यक्ती उभे केले.

साठेखत झाले तेव्हा या दोघांनी संचेती यांच्याकडून 50 लाख रुपये घेतले. फसवणूक झाल्याची बाब संचेती यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पैशाची मागणी केली तेव्हा आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. संचेती यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या