Wednesday, April 24, 2024
Homeनगरबनावट डिझेल प्रकरण : राहुरीच्या शब्बीर देशमुखसह मुलाला अटक

बनावट डिझेल प्रकरण : राहुरीच्या शब्बीर देशमुखसह मुलाला अटक

अहमदनगर|Ahmedagar

शहरातील बनावट डिझेल छापा प्रकरणी मुख्य सुत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. राहुरी येथील शब्बीर देशमुख व मुदस्सर देशमुख असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

- Advertisement -

श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक तथा तपासी अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने लोणी येथून दोघांना अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नगर शहरातील जीपीओ चौकात तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या पथकाने छापा टाकून सुमारे दोन हजार लीटर बनावट डिझेल जप्त केले होते. यापूर्वी दोघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सुत्रधार अटक केल्याने डिझेल भेसळीची रॅकेट उघडकीस येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या