Wednesday, April 24, 2024
Homeनगरबनावट चेक प्रकरणातील मुख्य सूत्रधार दिल्लीतून जेरबंद

बनावट चेक प्रकरणातील मुख्य सूत्रधार दिल्लीतून जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वेगवेगळ्या फर्म, सरकारी एजन्सीच्या नावे बनावट चेक तयार करून ते बँकेत वटविण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीतील मुख्य सूत्रधाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली येथे अटक केली.

- Advertisement -

विजेंद्रकुमार ऊर्फ विजेंद्र रघुनंदनसिंग दक्ष (वय 39 रा. दक्षिण दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 7 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

वेगवेगळ्या फर्म, सरकारी एजन्सी यांच्या नावाने बनावट शिक्के तसेच बनावट व खोटे चेक तयार करून त्यावर खोट्या सह्या करत ते बँकेत वटविण्याचा प्रयत्न करणार्या टोळीचा नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी आठ जणांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

दिल्ली म्युन्शीपल कौन्शिलच्या नावे अडीच कोटी रूपयांचा एक बनावट चेक विपूल वक्कानी, यशवंत देसाई, नरेश बालकोंडेकर हे घेऊन सावेडीतील स्टेट बँकेच्या शाखेत आले. त्यांनी बँकेत चेक वटविण्यासाठी दिला. या चेक बाबत शाखेतील मॅनेजरला शंका आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर हा बनावट चेकचा प्रकार समोर आला. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मिथून घुगे, पोलीस कर्मचारी सचिन आडबल, विशाल दळवी, लक्ष्मण खोकले, रोहित यमूल, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या