Friday, April 26, 2024
Homeनगरबनावट दारू बनवणार्‍या कारखान्यावर छापा

बनावट दारू बनवणार्‍या कारखान्यावर छापा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील जिरेवाडी येथे एका शेतात सुरू असलेल्या बनवाट दारू बनविण्याच्या कारखान्यावर पुणे उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून कारवाई केली. यामध्ये वाहनासह सुमारे 6 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सतिश नवनाथ डमाळे, नितीन रामनाथ डमाळे, (38, दोघे रा. बोंदरवाडी), सुखदेव ज्ञानदेव आंधळे (रा. जिरेवाडी. ता. पाथर्डी), अरूण विठ्ठल कराड, संजय विठ्ठल कराड (रा. येळी. ता. पाथर्डी) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत उत्पान शुल्कच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान गडाच्या पायथ्याला जिरेवाडी येथे आंधळे याच्या शेतातील घरात बनावट दारू बनवली जात असल्याची माहिती पुणे उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार उत्पान शुल्क पुणे विभागाचे उपआयुक्त मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी जिरेवाडी येथे छापा टाकण्यात आला.

या छाप्यात 70 लीटर स्पिरीट, 175 लिटर देशी दारू, देशी दारूच्या 1900 बाटल्या, झाकणे, रिकाम्या बाटल्या, रसायण व टाटा कंपनीचा टेम्पो असा एकुण 5 लाख 82 हजार 325 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाचही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांना पाथर्डी न्यायालयासमोर हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरिक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरिक्षक ए.बी. पाटील, श्रीरामपूर विभागाचे निरिक्षक बी.बी. हुलगे, आर.ए. घोरपडे, ए. के. शेख, कर्मचारी प्रताप कदम, अमर कांबळे, एस. एस. पोंधे, अहमद शेख, भरत नेमाडे, अनिल थोरात, अमोल दळवी, एस. व्ही. बिटके, एन.आर. ठोकळे, पी.डी. साळवे यांनी केली. अधिक तपास भरारी पथकाचे दुय्यम निरिक्षक ए.सी. फडतरे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या