Wednesday, April 24, 2024
Homeजळगावफेकरी टोलनाका १ डिसेंबर पासून महागणार

फेकरी टोलनाका १ डिसेंबर पासून महागणार

दिपनगर, ता.भुसावळ (वार्ताहर)- bhusawal

तालुक्यातील फेकरी गावाजवळील असलेल्या टोल नाक्यावरील दरात १ डिसेंबर पासून वाढ करण्यात आली असून हलके वाहने सोडून जड वाहनांच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

भारत सरकार सडक परीवहन आणि राज मार्ग नवी दिल्लीच्या कार्यालय आदेश १६१० अ दि. १ जूलै २००९ अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्यातील कि. मी. ३९९ स्थित फेकरी गावाजवळील टोल नाक्यावरील दरात दि.१ डिसेंबर २०२० ते ३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत नवीन दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन दरात हलके वाहनांना वगळून बस, ट्रक, टँकर, जड व अतिजड वाहनांच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

हलके वाहन जुने दर एकेरी प्रवास १५ रुपये नवीन दर १५ रुपये दैनिक पास जुने दर २२.५० रुपये नवीन दर २२.५० रुपये. मासिक पास जुने दर ४५० रुपये नवीन दर मासिक पास ४५० रुपये, बस एकेरी प्रवास जुने दर ३५ रुपये नवीन दर ४० रुपये, दैनिक पास जुने दर ५२.५० रुपये नवीन दर ६० रुपये, मासिक पास जुने दर १०५० रुपये, नवीन दर १२०० रुपये आहे. जड वाहने एकेरी प्रवास जुने दर ४५ रुपये नवीन दर ५० रुपये दैनिक पास जुने दर ६७.५० रुपये, नवीन दर ७५ रुपये मासिक पास जुने दर १३५० रुपये, नवीन दर मासिक पास १५०० रुपये करण्यात आलेली आहे.

अति जड वाहने एकेरी प्रवास जुने दर ६० रुपये, नवीन दर ६५ रुपये दैनिक पास जुने दर ९० रुपये, नवीन दर ९७.५० रुपये मासिक पास जुने दर १८०० रुपये, नवीन दर १९५० रुपये करण्यात आले असल्याची माहिती फेकरी टोल नाक्याचे व्यवस्थापक योगेश गुंजाळ यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या