Wednesday, April 24, 2024
Homeजळगावअज्ञात वाहनाच्या धडकेत पिता-पुत्र ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पिता-पुत्र ठार

फैजपूर – Faizpur – प्रतिनिधी :

फैजपूर येथून जवळच असलेल्या पिंपरुड फाट्याजवळ अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक देऊन झालेल्या अपघातात मोटार सायकलस्वार पिता-पुत्र ठार झाल्याची घटना शनिवार सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान घडली.

- Advertisement -

सदरची घटनाही फैजपुर-भुसावळ रोड वरील सोनम एंटरप्राईजेस जवळ घडली. अपघातात ठार झालेल्या पिता-पुत्राचे नावे सेवानिवृत्त एम.एस.इ.बी कर्मचारी गोपाळ गेंदराज पाटील (वय65) वडील यांनी बरेच वर्ष एम.एस.इ.बी.बामणोद येथे ऑपरेटर म्हणून काम केले होते ,तर खेमचंद गोपाळ पाटील मुलगा (वय33) रा.गुरुदत्त कॉलनी फैजपूर येथील आहे.

खेमचंद पाटील व गोपाळ पाटील हे दोघे पिता-पुत्र (एम.एच.19.बी.डी.5442) या मोटर सायकलने चिखली ता.यावल येथील शेतातून देवदर्शन करून फैजपूरकडे घरी परतत असताना पिंपरुड फाट्यावरील सोनम एंटरप्राइजेस जवळ आमोद्याच्या दिशेने जाणार्‍या अज्ञात वाहनाने पाटील पिता-पुत्रांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

अपघाताचे वृत्त कळताच फैजपूर येथील भरत अरोरा व अमोल चौधरी, सुधाकर चौधरी, विकी जैस्वाल, मुकेश मेढे, सुधिर सोनार, प्रतिक मेढे,हर्षल संदांशिव,मुकेश हिवरे , गोलु चौधरी,बाळकृष्ण झोपे,संदीप तायडे ,पराग सराफ, सह नागरिकांनी मदतीला धाव घेतला.या अपघातात गोपाळ पाटील हे जागीच ठार झाले तर खेमचंद पाटील या तरुणास गंभीर जखमी अवस्थेत फैजपूर येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी असलेल्या खेमचंद पाटील या तरुणास पुढील उपचारासाठी तात्काळ जळगाव येथे अमोल चौधरी या रुग्णवाहिका चालक घेऊन जात असतांना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ स.पो.नि.प्रकाश वानखडे,फौजदार रोहिदास ठोंबरे,अमजद पठाण व त्यांचे सहकारी अपघात ग्रस्त ठिकाणी भेट देऊन चौकशी केली. या अपघाता प्रकरणी पोलिसात अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मयत झालेल्या गोपाळ पाटील व खेमचंद पाटील या पिता-पुत्रांचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.तर दुपारी 4 वाजेच्या सुमारास पिता-पुत्रावर एकाच वेळी अंतसंस्कार शोकाकुल वातावरणात करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी व परिसरातील नागरिकांनी एकच आक्रोश केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या