Afghanistan crisis : तोबा गर्दीचा ‘तो’ फोटो अफगाणिस्तानातील नाही!, जाणून घ्या सत्य

jalgaon-digital
1 Min Read

दिल्ली | Delhi

अमेरिकेने (America) जवळजवळ दोन दशकानंतर अफगाणिस्तानातून (Afghanistan) काढता पाय घेतला आणि अल्पावधितच संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानने (Taliban) ताबा मिळवला.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने (Afghanistan Taliban Crisis) कब्जा मिळवल्यानंतर तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी काबुल विमानतळावर मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानातील बिघडलेल्या परिस्थितीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

यातच दोन दिवसांपूर्वी एक फोटो समोर आला होता. त्यात अमेरिकेच्या हवाई दलाच्या विमानाने ६०० हून अधिक लोक बसलेले दिसत होते. तो फोटो अफगाणिस्तान मधील असल्याचा दावा केला जात होता. मात्र हा फोटो अफगाणिस्तानमधील नसून २०१३ सालचा फिलिपिन्समधील (phillipines) फोटो आहे.

फिलिपिन्समधील टॅक्लोबान शहरावर विनाशकारी चक्रीवादळ धडकल्यानंतर काही दिवसांनी यूएस एअरफोर्सकडून तिथे अडकलेल्या लोकांच्या मदतकार्यावेळचा आहे. काही लोकांनी हा फोटो चुकीच्या पद्धतीनं व्हायरल केला आहे. (philippines photo)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *