Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकपेठ : नदी पार करताना वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास

पेठ : नदी पार करताना वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास

पेठ : तालुक्यातील शेपूझरी गावालगत असणाऱ्या पार नदीवर पूल नसल्याने वाहनधारकांना जीव घोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे येथील नदीवर लवकरात लवकर पूल बांधावा अशी मागणी ग्रामस्थांमार्फत करण्यात येत आहे.

पेठ तालुक्यात प्रसिद्ध असलेले देवस्थान म्हणून शेपुझरी ची ओळख आहे. महाशिवरात्री व आषाढी एकादशीला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते तर इतर दिवशीही भाविकांची मांदियाळी असते. परंतु पावसाळयात शेपुझरी व इतर गावांचा संपर्क तुटून जातो. या परिसरातील अंबास, कहांडोळपाडा, वडपाडा, गांडोळे आदी गावांना नदीच्या पात्रातून जीवघेणा प्रवास करून नदी पार करावी लागते.

- Advertisement -

शेपुझरी गावाजवळील पार नदी सुरगाणा व पेठ तालुक्यातून वाहणारी पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी आहे. पावसाळ्यात प्रचंड पूर येत असल्याने येथील अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे येथील नागरिकांना दरवर्षी पुराचा तसेच येण्याजाण्याचा त्रास सहन करावा लागतो. लवकरात लवकर पूल बांधावा अशी परिसरातून जोर धरू लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या