Friday, April 26, 2024
Homeनाशिकपरिसरातील नागरिक व घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने नगरसेवकांचा सत्कार

परिसरातील नागरिक व घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने नगरसेवकांचा सत्कार

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

नगरसेवक योगेश शेवरे यांची महाराष्ट्र निर्माण सेना कामगार पदी निवड झाल्याबद्दल सातपूर परिसरात असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच घंटागाडी कर्मचाऱ्यांसाठी होणारी पायपीट ओळखल्याबद्दल कर्मचाऱ्यांनीही त्यांचं विशेष अभिनंदन काल केले.

- Advertisement -

महाराष्ट्र निर्माण सेनेचे नगरसेवक योगेश शेवरे यांची महाराष्ट्र निर्माण सेना कामगार पदी निवड झाल्याबद्दल परिसरातील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र देवरे मंगेश उदावंत, राजाभाऊ सिंग, हर्षल आहेर, कुलदीप तिवारी, राहुल सहाने सत्कार करण्यात आला.

तसेच सातपूर घंटागाडी पार्किंग येथे सलीममामा शेख व योगेशभाऊ शेवरे यांचा घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच अनिल मौले, सुनिल मौले व सतीश काळे ह्यांनी सुद्धा कामगारांना पाठिंबा दिला.

तसेच घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या यापुढे सोडविण्यात येतील असे सलीममामा शेख व योगेशभाऊ शेवरे यांनी सत्कार प्रसंगी आश्वासन दिले. सातपूर घंटागाडी कामगारांच्या वतीने शरद आहिरे, शाम प्रधान, राजु विटकर, गौतम नेटावटे, नितीन सोनकांबळे, विजय गांगुर्डे, रवी पगारे, संतोष शिंदे, अनिल विटकर, गणेश काळे यांनी कार्यक्रमाला परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या