Thursday, April 25, 2024
Homeनगररॅपीड अँटीजेन टेस्टची सुविधा श्रीरामपुरातील इंदिरा मंगल कार्यालयात

रॅपीड अँटीजेन टेस्टची सुविधा श्रीरामपुरातील इंदिरा मंगल कार्यालयात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोव्हिड-19 आजाराच्या अनुषंगाने श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागात माझे कुटुंब माझी जबाबदारी

- Advertisement -

या मोहिमेची पहिली कुटुंब सर्वेक्षणाची फेरी सर्व स्टाफ, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व नागरिक यांच्या सहकार्याने पार पडली. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाकडून मोफत रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टची सुविधाही प्रियदर्शनी इंदिरा मंगल कार्यालय, बजारतळ येथे सुरू केेली आहे. त्याची वेळ दुपारी 1 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.

आपण सर्व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे कोव्हिड-19 आजार आटोक्यात आणण्यास मदत झाली. तरीही या कुटुंब सर्वेक्षणाची दुसरी फेरी दि. 14 ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत शहरातील विविध प्रभागांत पुन्हा चालू झाली आहे.

या दुसर्‍या सर्वेक्षण फेरीत आमच्या आरोग्यसेविका व आधारसेविका यांना तपासणीस व माहिती देण्यास सहकार्य करावे. जेणे करून हा आजार पूर्णपणे संपुष्टात येईल, असे आवाहन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सर्व नगरसेवक आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन पर्‍हे, डॉ. संकेत मुंदडा यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या