Thursday, April 25, 2024
Homeजळगावसाकेगाव ग्रा.पं.मध्ये आय सेन्सर बायोमेट्रिक सिस्टम

साकेगाव ग्रा.पं.मध्ये आय सेन्सर बायोमेट्रिक सिस्टम

साकेगाव, ता. भुसावळ -Bhusawal – वार्ताहर :

स्मार्ट व्हिलेज साकेगाव ग्रामपंचायत जिल्ह्यात सतत नाविन्यपूर्ण  उपक्रम राबवित असून कर्मचारी वर्गाची सेंसर बायोमेट्रिक हजेरी पद्धत जिल्ह्यातील एकमेव स्मार्ट व्हिलेज येथिल ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम असल्याचे प्रतिपादन आ. संजय सावकारे यांनी बायोमेट्रिक मशीनच्या उद्घाटन प्रसंगी केले.

- Advertisement -

प्रसंगी सरपंच आनंद ठाकरे, संजय पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, विष्णू सोनवणे, माणिक पाटील, सुभाष कोळी, डॉ. बाळासाहेब पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व गावातील मान्यवरांची उपस्थिती होती.

ग्रामपंचायत प्रशासन सदैव विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यात जिल्ह्यात अग्रेसर असल्यामुळे पायलेट प्रोजेक्ट व्हिलेज म्हणून सन्मानित झालेले आहे.

येथिल ग्रामपंचायतीत तब्बल २५ कर्मचारी आहे. त्यांची वेळोवेळी हजेरी डिजिटल बायोमेट्रिक पद्धतीने व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने करोनाची परिस्थिती लक्षात घेता थंम ऐवजी आय सेन्सर बायोमेट्रिक मशीन खरेदी करून एक मे कामगार दिन रोजी तालुक्याची कर्तव्यदक्ष आ. संजय सावकारे यांच्या हस्ते फित कापून मशीनचे उद्घाटन करण्यात आले.

ग्रामपंचायत प्रशासनाचा राज्यस्तरीय स्मार्ट विलेज निर्मितीच्या संकल्प असून लवकरच विविध विकासकामांच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासन राज्यस्तरीय लौकिक मिळवेल असा विश्वास सरपंच श्री ठाकरे यांनी प्रसंगी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या