Wednesday, April 24, 2024
Homeनगरविस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांच्या भरतीमध्ये झेडपी शिक्षकांचा समावेश व्हावा

विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांच्या भरतीमध्ये झेडपी शिक्षकांचा समावेश व्हावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख या पदांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे होणार्‍या भरती प्रक्रियेत जिल्हा परिषद शिक्षकांचा समावेश करण्याची मागणी राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांना देण्यात आले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक अतिशय दुर्गम भागात वाडी-वस्तीवर अतीशय प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. शिष्यवृत्तीसारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये ग्रामीण महाराष्ट्र आपला ठसा उमटवताना दिसत आहे. 10 जून 2014 ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र तांत्रिक सेवा वर्ग 3 मधील विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख या पदावर भरतीचे निकष देण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीत राज्यातील जिल्हा परिषदमध्ये शिक्षण विस्ताराधिकारी 50 टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर केंद्रप्रमुख 70 टक्के पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.

प्रशासन व्यवस्थेमध्ये ही महत्त्वाची दोन पदे रिक्त असल्यामुळे शिक्षण विभागातील प्रशासन, नियंत्रण, प्रशिक्षण आणि शालेय मूल्यमापनावर प्रचंड प्रमाणात ताण येत आहे. अधिसूचनेनुसार विस्तार अधिकारी पदे सरळसेवा 25 टक्के, विभागीय स्पर्धा परीक्षा 25 टक्के, पदोन्नती 50 टक्के याप्रकारे सेवाप्रवेश निकष आहेत. 2014 च्या अधिसूचनेनुसार नामनिर्देशन व विभागीय परीक्षा यामधील 50 टक्के पदावर भरती प्रक्रिया झाली नसल्याने मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्याची माहिती बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या