Friday, April 26, 2024
Homeनाशिकऑटोरिक्षांचा मीटर पुन:प्रमाणिकरणास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑटोरिक्षांचा मीटर पुन:प्रमाणिकरणास ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (Nashik Regional Transport Authority) ऑटोरिक्षा (Autorickshaw) परवानाधारकांना देण्यात आलेल्या भाडेवाढीस अनुसरून ऑटोरिक्षा मीटरचे पुन:प्रमाणिकरण करणे आवश्यक होते.

- Advertisement -

परंतू बहुतांश ऑटोरिक्षांच्या (Autorickshaw) मीटरचे पुन:प्रमाणिकरण झाले नसल्याने ऑटोरिक्षा मीटर (Autorickshaw meter) पुन:प्रमाणिकरणास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत 30 एप्रिल 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे (Regional Transport Officer Pradeep Shinde) यांनी कळविले आहे. वर नमूद मुदतवाढ दिलेल्या कालावधीत ऑटोरिक्षा मीटरचे पुन:प्रमाणिकरण न केल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी 1 दिवस परवाना निलंबन करण्यात येईल.

परवाना निलंबन (License suspension) कालावधी किमान सात दिवस व कमाल 40 दिवसांचा राहिल. त्याचप्रमाणे परवाना निलंबना ऐवजी तडजोड शुल्क मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी रुपये 50 आकारण्यात येईल. तडजोड शुल्क किमान रूपये 500 व कमाल रूपये दोन हजार पेक्षा अधिक असणार नाही, असेही प्रदिप शिंदे यांनी सांगितले आहे.

ऑटोरिक्षा परवानाधारकांनी ऑटोरिक्षा मीटर (Autorickshaw meter) नविन दराप्रमाणे सुधारित करून घेण्यात यावे. तसेच मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 1 मे 2023 पासून राबविण्यात येणाऱ्या तपासणी मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहनही प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या